ऊस प्रात्यक्षिक क्षेत्राची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून पाहणी

0
16

पुणे दि. 13 : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथील ऊस पीक प्रात्यक्षिक क्षेत्राची पाहणी करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऊस लागवडीच्या नवीन तंत्रज्ञानाची तपशीलवार माहिती घेवून चर्चा केली. त्यांच्यासोबत राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संस्थेचे अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री खासदार शरद पवार उपस्थित होते.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत वसंतदादा पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त संस्थेच्यावतीने आयोजित “शुगरकेन व्हॅल्यू चेन-व्हिजन 2025 शुगर” या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात करण्यात आले होते. या परिषदेच्या उदघाटनानिमित्त पंतप्रधान श्री. मोदी यांचे आज या परिसरात आगमन झाले. त्या प्रसंगी त्यांनी या परिसरातील नवीन तंत्रज्ञानावर आधारित विविध प्रात्यक्षिक ऊस क्षेत्राची पाहणी केली.
ऊसाच्या लागवडीतील नवीन तंत्रज्ञानाविषयी, नवीन बियाण्यांविषयी, खतांविषयी पंतप्रधान श्री मोदी यांनी माहीती घेत अत्यंत बारकाईने सर्व प्लॉटची पाहणी केली. ऊस पीकाच्या नवीन तंत्रज्ञानाविषयी श्री. मोदी यांनी संस्थेच्या संशोधकांकडून माहिती घेतली. यावेळी त्याच्या सोबत केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, पालकमंत्री गिरीश बापट, संस्थेचे महासंचालक शिवाजीराव देशमुख उपस्थित होते