..तर देश देईल ती शिक्षा भोगायला तयार : मोदी

0
8

पणजी, दि. 13 – काळ्या धनाचा बिमोड करण्यासाठी घेतलेला निर्णय चुकीचा किंवा स्थार्थापोटी असल्याचे सिद्ध झाले तर चौकात उभे करा, देश जी शिक्षा देईल ती भोगायला मी तयार आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी येथे मोपा विमानतळाच्या कोनशीला अनावरणाच्या वेळी म्हणाले. काळे धन, बेईमानी, भ्रष्टाचाराचा गेल्या ७0 वर्षांचा आजार १७ महिन्यात निपटणार, त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, अस आवाहनही त्यांनी केले. मोदी यांच्या या आवाहनानंतर हजारोंच्या संख्येने उपस्थितांनी उभे राहून टाळ्यांचा गजर केला आणि मोदींना या लढाईत पाठिंबा दर्शविला.काळे धन उघड करण्यासाठी मुदत दिली होती. व्यावसायिकांनी दंडासमवेत तब्बल ६७ हजार कोटी रुपये सरकारी तिजोरीत जमा केले. दोन वर्षात सर्वेक्षण, धाडी, घोषणापत्रे या माध्यमातून सव्वा लाख कोटी रुपये तिजोरीत आले.