गोवारी  जातीचा समावेश अनुसूचित जमातीत व्हावा- खासदार नाना पटोले

0
13

नवी दिल्ली-२३ : गोवारी जातीचा समावेश अनुसूचित जमातीत करण्यात यावा अशी मागणी गोंदिया व भंडारा मतदारसंघाचे खासदार नाना पटोले यांनी  पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांना  निवेदनाद्वारे केली आहे.
गोवारी शहीद दिनाच्या पार्श्वभूमीवर श्री.पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे. या पत्रात म्हटले आहे, महाराष्ट्रातील गोवारी समाज बांधवांचे राहनीमान, त्यांची संस्कृती ही आदिवासी बांधवांप्रमाणेच आहे. गोवारी  समाज बांधव हे  पर्वत रांगांमध्ये आणि जंगल भागात राहतात.  समाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक
विकासापासून हा समाज अजूनही दूरच आहे. २३ नोव्हेंबर १९९४ ला गोवारी समाजबांधवांनी नागपूर अधिवेशनादरम्यान विविध मागण्यांसाठी केलेल्या आंदोलनात ११४ गोवारी बांधव शहीद झाले.आज गोवारी बांधव नागपूर येथील झिरो माईल परिसरात श्रध्दांजली वाहून शहीद दिन पाळत आहेत. मात्र, त्यांना अजूनही न्याय मिळालेला नाही.

गोवारी समाज बांधवांचा सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक विकास होण्यासाठी राज्यघटनेच्या ३४२ कलमानुसार गोवारी जातीचा समावेश अनुसूचित जमातीत करण्यात यावा अशी मागणी श्री. पटोले यांनी या निवेदनात केली .