नोटाबंदीविरोधात विरोधकांचे धरणे आंदोलन, 200 खासदार सहभागी

0
4
नवी दिल्ली, दि. 23 – नोटाबंदीविरोधात विरोधी पक्षांनी संसद परिसरात एकजूट दाखवत धरणे आंदोलन केले. संसद परिसरातील गांधी पुतळ्याजवळ हे धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात १३ राजकीय पक्षांच्या दोनशेहून अधिक खासदारांनी सहभाग घेतला होता. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधीदेखील यामध्ये सहभागी होते. या लढाईला जनआंदोलनाचे स्वरूप देण्याच्या व्यूहरचनेवर त्यांचा आपसात विचारविनिमय सुरू आहे. राष्ट्रपती भवनावर जाण्याचा मार्ग न स्वीकारता २०० विरोधी खासदारांनी संसद परिसरात मानवी साखळी करून आंदोलन संपवलं.
माकपाने राज्यसभेत नोटाबंदीवरील चर्चेदरम्यान पंतप्रधान गैरहजर राहत असल्याने, त्यांच्याविरुद्ध संसद अवमानाची नोटीस काढण्याची तयारी चालवली आहे. राष्ट्रपती भवनवर मोर्चा काढण्याचा पक्षाने निर्णय घेतलेला नाही. विरोधी नेते संसदेत आणि संसदेच्या आवारातही हा मुद्दा उपस्थित करतील, असे माकपाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी सांगितले होते.