ओबीसी मंत्रालयाला राज्य सरकारची मान्यता-ओबीसी महामोर्च्याचे यश

0
8

नागपूर,दि.26- आज मुंबईत झालेल्या राज्य सरकारच्या मंत्रीमंडळ बैठकीत बहुसंख्येने असलेल्या ओबीसी समाजाच्या विकासासाठी ओबीसी मंत्रालय स्थापन करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आजपर्यत मागासलेल्या या समाजाला सामाजिक न्याय विभागाकडून मिळणारी सापत्न वागणूक थाबंवून ओबीसींच्या अधिकारासाठी व विकासासाठी ओबीसींचे स्वतंत्र मंत्रालय सुरु करण्यात यावे अशी मागणी वारंवार राष्ट्रीय ओबीसी महासंघ व राज्यातील सर्व ओबीसी संघटनानी केली होती.त्यातच नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात 8 डिसेंबरला लाखोंचा अशा ओबीसींचा पहिलाच मोर्चा काढून सरकारचे लक्ष वेधले होते.ओबीसी महामोर्च्याचा संघटित दबावामुळेच हे शक्य झाले असले तरी ओबीसींच्या जनगणेशिवाय या मंत्रालयाचे कामकाज पुर्ण होऊ शकणार नाही.तेव्हा सरकारने ओबीसींची जनगणनाही त्वरीत जाहीर करावी अशी भूमिका राष्ट्रीय ओबीसी महासंघाने घेतली आहे.
राज्यसरकारने आज मंजुरी दिलेल्या ओबीसी मंत्रालयामध्ये ओबीसीसंह भटक्या विमुक्त जातींता सुध्दा समावेश राहणार असून येत्या तीन महिन्यांच्या आत सर्व पदे भरण्यात येणार असल्याचे सरकारने जाहिर केले आहे. आता राज्यात ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालय असल्याने  स्वंतत्र मंत्र्यांसह, स्वतंत्र सचिव, उपसचिव अशी ५२ नवी पदे भरण्यात येणार आहे.  सामाजिक न्याय विभागाकडून नस्त्या हस्तांतरीत करण्यात येणार आहेत. ओबीसी महामंडळ खात्याकडे वर्ग केले जाईल. तर मंत्रालयात स्वतंत्र जागा उपलब्ध करून देणार आहे.
राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्यावतीने नागपूर हिवाळी अधिवेशऩावर 8 डिसेंबरला काढण्यात आलेल्या ओबीसी महामोर्च्याला यश आले असून राज्यसरकारने ओबीसी मंत्रालयाच्या मागणीला आज मुंबई येथे पार पडलेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली आहे.हे यश हे राष्ट्रीय ओबीसी महासंघ व सर्व ओबीसी संघटनाचे असल्याचे सुतोवाच राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सयोंजक प्रा.डाॅ.बबनराव तायवाडे व राजकीय पक्ष समन्वयक माजी खासदार डाॅ.खुशाल बोपचे, निमंत्रक सचिन राजूरकर,संघटक प्रा.शेषराव येलेकर,प्राचार्य अशोक जिवतोडे,प्रसिध्दी प्रमुख खेमेंद्र कटरे,युवा समिती प्रमुख मनोज चव्हाण,संघटक जिवन लंजे, बबलू कटरे, संजय माफले,शरद वानखेडे,डाॅ.अजयराव तुमसरे,विनय डहाके,गुणेश्वर आरीकर,विजय पिदुरकर,सुषमा भड,निकेश पिने,क्रिष्णा देवासे,शुभांगी मेश्राम,गोविंद वरवाडे,प्रा.संजय पन्नासे,विनोद हजारे,भूषण उईके,रेणुका तुरंग, अजिंक्य देशमुख, आकाश जावळे,शुभेच्छा तिडके,श्रुती राजूरकर,रोशन कुंभलकर,उज्वला महल्ले,श्यामल चन्ने,निलेश कोढे आदींनी सरकारचे अभिनंदन केले आहे.ओबीसी मंत्रालय मिळाले आता आमचा लढा ओबीसींच्या जनगऩेसाठी राहणार असून ओबीसी अधिकारासाठी महासंघ सातत्याने लढाई लढत राहणार असल्याचे राष्ट्रीय ओबीसी महासंघाने म्हटले आहे.राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी मंत्रालयाची मागणी मंत्रीमंडळात मंजुर केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन महासंघाच्यावतीने करण्यात येत आहे.