त्र्यंबकेश्वरमध्ये पुरोहितांच्या घरावर आयकर विभागाने मारले छापे

0
10

नाशिक, दि. 27 – काळ्या पैशांविरोधात केंद्र सरकारने सुरू केलेल्या मोहीमेत आता धार्मिक स्थळे तपास यंत्रणांच्या रडावर आहेत. देशभरातील महत्त्वाच्या धार्मिक केंद्रावर आयकर विभागाने छापेमारी करायला सुरुवात केली आहे. त्र्यंबकेश्वरमध्येही अनेक पुरोहितांच्या घरी आयकर विभागाने धाड टाकली आहे. 2 पुरोहितांकडे मोठ्या प्रमाणात काळा पैसा असल्याच्या आरोप करण्यात आला आहे. या आरोपाच्या पार्श्वभूमीवर आयकर विभागाने ही कारवाई सुरू केली आहे.

या पुरोहितांकडे जमिनी, पैसा व दागिने यांचे मोठे घबाड असल्याची माहिती तपास यंत्रणांना मिळाली असून पुरोहितांकडे असलेली संपत्ती वैध आहे की अवैध ? याचा देखील तपास सुरू करण्यात आला आहे. सध्या पुरोहित नीलेश विद्याधर चांदवडकर यांच्या घरी आयकर विभागाची कारवाई सुरू आहे, अशी माहिती मिळते आहे.