राज्यातही ‘पारदर्शक’ कारभार हवा, मंत्रिमंडळ बैठकीत शिवसेनेचा आक्रमक पवित्रा

0
13

मुंबई दि.03-भाजपने ज्या पारदर्शकतेच्या मुद्द्यावर मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिवसेनेची कोंडी केली त्याच मुद्द्यावरून आता शिवसेना आक्रमक झाली आहे. ज्या प्रमाणे भाजप मुंबई महानगरपालिकेत पारदर्शकता असली पाहिजे असे म्हणत आहे, त्याचप्रमाणे राज्य सरकारमध्येही पारदर्शकता यायला पाहिजे असे मत शिवसेनेचे विधिमंडळ गटनेते एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. मुख्यमंत्र्यांनीही यासंदर्भात लवकरच निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.
शुक्रवारी मुंबईत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत शिवसेनेने पारदर्शकतेच्या मुद्द्यावर आक्रमक पवित्रा मांडला. मुख्यमंत्र्यांनी मुंबई महापालिकेत जो मुद्दा उपस्थित केला, तोच मुद्दा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारच्या कारभाराबाबात उपस्थित केल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. महापालिकेतच का राज्य सरकारच्या कारभारातदेखिल पारदर्शकता आली पाहिजे. कॅबिनेटमध्येही तची पारदर्शकती असावी. मंत्रिमंडळाच्या बैठकीत जनतेच्या हिताचे निर्णय घेतले जातात. त्याची माहिती सर्व जनतेला असावी. त्यासाठी राज्य मंत्री, पत्रकार, विरोधी पक्ष नेते, लोकायुक्त यांचा या बैठकीत सहभाग असावा असे एकनाथ शिंदे म्हणाले. शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत आग्रहाने ही मागणी केली. तसेच उद्धव ठाकरे सांगतील त्यादिवशी शिवसेनेचे सर्व मंत्री राजीनामा देतील, असेही यावेळी शिवसेनेच्या मंत्र्यांनी सांगितले.