अवकाळी पाऊसः नांदेड जिल्ह्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा

0
9

नांदेड दि.1:-मराठवाड्यातशनिवार 1एप्रिल 2017 पासून पुढील 48 तासात काही ठिकाणी विजा चमकणे तसेच पावसाची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क रहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.भारतीय हवामान खात्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे देण्यात आलेल्याया इशाऱ्यात येत्या 48 तासात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविल्याच्या पार्श्वभुमीवर आपत्ती व्यवस्थापन कक्षाने विविध यंत्रणांना सतर्क राहण्याचे सूचना दिल्या आहेत. नागरिकांनीही विशेषत: शेतकऱ्यांनी काढणीस आलेल्या शेतमालाबाबत दक्षता घ्यावी, असेही आवाहन करण्यात आले.शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतातील पिके आणि धान्यसाठ्याची काळजी घ्यावी व कापलेले धान्य सुरक्षित ठिकाणी ठेवावे. बाजारपेठेत विक्रीसाठी आणलेली धान्ये सुरक्षित राहतील याची काळजी घ्यावी. विजा चमकत असताना उंच झाडाचा आसरा घेणे टाळावे व सुरक्षित ठिकाणी आसरा घेऊन सावधगिरी बाळगावी. गाव, तालुका व उपविभागाच्या ठिकाणी असा प्रश्न उद्भविल्यास स्थानिक प्रशासनास व नागरीकांस सतर्क राहण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.याशिवायअत्यावश्यक बाबींसाठी तातडीच्या मदतीसाठी जिल्हा प्रशासनाशी तसेच पुढील दूरध्वनी क्रमांकाशी संपर्क साधावा.हे क्रमांक असे जिल्हाधिकारी कार्यालय नियंत्रण कक्ष- 02462-235077,नि:शुल्क दूरध्वनी क्रमांक(टोल फ्री)- 1077,महानगरपालिका नियंत्रण कक्ष- 02462234461,पोलीस नियंत्रण कक्ष- 02462 234720,आरोग्य विभाग- 02462 236699,नि:शुल्क दूरध्वनी क्रमांक(टोल फ्री)- 108.आपत्तकालीन परिस्थितीबाबत माहिती देण्यासाठी या दूरध्वनी क्रमांकाशी संपर्क साधता येईल.