दुष्काळमुक्त महाराष्ट्र हेच आमचे ध्येय- मुख्यंमंत्री

0
12

वर्धा दि 5 :- दुष्काळ हा मानवनिर्मित आहे. शासन पुन्हा जलयुक्त शिवारच्या माध्यमातून निसर्गाशी मैत्री करतेय.वाटरशेड च्या माध्यमातून नैसर्गिक क्षमता पुनरुज्जीवित करन्यायासाठी मायथा ते पायथा काम करतोय निसर्गा कडून घेतलेले निसर्गाला परत करण्यासाठी सावंगी पोड या आदिवासी बहुल गावातील गावकरी जी मेहनत घेताहेत त्यावरून पुढील 50 वर्ष या गावात दुष्काळ येणार नाही . मित्र म्हणून सरकार तुमच्यासोबत आहे.परिवर्तन घडत निसर्गाशी सर्वांची मैत्री झाली असून त्यातून दुष्काळ मुक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकार करू या असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेल्या सावंगी पोड या गावात विविध विकास कामाची पाहणी आणि सामाजिक संघटनांचा सत्कार समारंभात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी खासदार रामदास तडस, आमदार पंकज भोयर, अप्पर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, विभागीय आयुक्त अनुप कुमार, जिल्हाधिकारी शैलेश नवाल माजी आमदार दादाराव केचे व सरपंच वर्षा धुर्वे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

आपल्या देशात अनेक संस्कृती व सभ्यता संपल्या आहेत . मात्र आदिवासी संस्कृती अजूनही जिवंत आहे. याचे एकमेव कारण म्हणजे आदिवासी समाजाने निसर्गाचे शोषण नव्हे तर रक्षण केले आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की , वॉटर काप स्पर्धेत काम करणारे सर्वच नायक आहेत. पाणी हे जीवन आहे. या गावाने केलेली मेहनत येणाऱ्या पिढीसाठी सकारात्मक बिजारोपण करेल, असे मुख्यमंत्री म्हणाले. सरकारच्या योजना या जनतेच्या होतात तेव्हाच त्या यशस्वी होतात. जलयुक्त शिवार हि अशीच लोकसहभागामुळे यशस्वी झालेली योजना आहे. हि सरकारची योजना नसून जनतेची आहे. यासाठी तुम्ही जेवढी मेहनत कराल तेवढेच सरकार तुमच्या पाठीशी उभे राहिल अशी ग्वाही त्यांनी दिली.

वॉटर कप स्पर्धेत 8 एप्रिल ते 4 मे 2017 या 27 दिवसात 1 लाख 75 हजार घनमीटर पाणीसाठा होईल एवढी कामे झाली असून 5 मे ते 22 मे या कालावधीत होणाऱ्या कामातून 5 लाख घनमीटर पाणीसाठा अपेक्षित आहे. या कामातुन 45 हजार मनुष्य दिवस काम अपेक्षित आहे. यशोदा नदी खोरे पुनरुज्जीवन अंतर्गत 630 किलोमीटर सरळीकरण व खोलीकरण होणार आहे. याचा फायदा 4 तालुक्यातील 143 गावातील 28 हजार शेतकरी कुटुंबाना होणार आहे.यावेळी पाणी फौंडेशनचे मंदार देशपांडे व उपस्थितांनी अन्न गुडगुडे, नाद गुडगुडे दुष्काळ ढिस्कॅव ढिस्कॅव, जल है तो कल है, दुष्काळाला लाथ मारा,असे नारे देऊन वातावरण जोशमय केले. यावेळी जलसंधारणाच्या कामात योगदान देणाऱ्या दिलासा संस्थेचे रवींद्र तांदळकर, आर्ट ऑफ लिव्हिग चे मनीष बदे , मनीष भाटे रोटरी क्लब नागपूर ,बजाज फौंडेशन मार्फत महेंद्र फाटे,रोटरी डॉ सचिन पावडे ग्रामविकास अधिकारी बोबडे यांचेसह विरुळ सरपंच साधना उईके यांनी सहा महिन्यांचे बाळ असताना काम केले त्याबद्दल त्यांचा मुख्यमंत्र्यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. आर्वी तालुक्यातील पुनर्वसित 17 गावातील 4400 सातबारा तयार झाले असून त्याती प्रातिनिधिक स्वरूपात विनोद खांडेकर नेरी , भीमराव तुमस्कर, भावराव कोरे यांना सातबाराचे वाटप करण्यात आले.