…अखेर ‘त्या’ गाडीवरील दिवा उतरला!

0
7

बेरार टाईम्सचा दणका

गोंदिया,दि.०५- व्हीव्हीआयपी संस्कृती मोडीत काढण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना पावले उचलली. त्याच्या आवाहनाला सर्वत्र उत्तम प्रतिसाद ही मिळाला. असे असताना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या गोंदियातील अधिकाऱ्यांने मात्र त्याकडे दुर्लक्ष केले. त्याविरुद्ध  बेरार टाईम्सने दखल घेत आज शुक्रवारला(दि.5) वृत्त प्रकाशित करताच प्रशासकीय यंत्रणेत एकच खळबळ उडाली. अखेर बेरार टाईम्सचा दणका पडताच त्या गाडीवरील अंबर दिवा सबंधित विभागाच्या अधिकार्याने पुन्हा चूक होऊ नये म्हणून लगेच काढला.
प्रधानमंत्री मोदी यांच्या आवाहनाप्रमाणे सर्व मंत्री-अधिकाऱ्यांच्या गाडीवरील दिवे हे १ मे नंतर काढून घ्यायचे होते. अनेकांनी ते त्या आधीच काढले. कोणीही लेखी आदेशाची वाट पाहत बसला नाही. असे असताना गोंदियातील राज्य उत्पादन शुल्क अधीक्षकांनी मात्र आपल्या गाडीवरील अंबर दिवा कायम ठेवला होता. याविषयीचे वृत्त बेरार टाईम्सच्या न्यूज पोर्टलवर झळकले. वृत्त प्रसारित होताच एकच खळबळ उडाली. आणि लगेच साहेबांनी आपल्या गाडीवरील दिवा हटविला.