जि.प.सदस्य ठक्करवाड यांच्या कार्यपद्धती चा बसव ब्रिगेड कडुन निषेध

0
41

बिलोली(नांदे़ड),दि.13, तालुक्यातील कासराळी येथील महीला सरपंचावर राजकीय सुडबुद्धीने अविश्वास दाखल करण्यास भाग पाडणा-या जि.प. सदस्य लक्ष्मण ठक्करवाड यांचा बसव ब्रिगेड संघटनेने जाहीर निषेध केला आहे.
बिलोली तालुक्यातील कासराळी येथिल सरपंच सौ.ललिता हायगले यांच्या वरील अविश्वास ठराव दाखल करणा-यात आला आहे.  वस्तुतः सौ.हायगले यांचे काम चांगले असतांना राजकीय सुडबुद्धीने हे कारस्थान करुन राजकीय मार्गातील अडथळा स्थानिक नेतृत्वांनी दुर केला. सौ.हायगले यांचे पती संग्राम हायगले हे साधारण पंधरा वर्षापूर्वी  दोनदा भाजपाचे जिल्हा परीषद सदस्य होते. तत्कालीन काळात भाजपाला बळ देण्यात  पक्ष वाढविण्यास हायगले यांचा सिंहाचा वाटा होता. पदोपदी हायगले यांच्या नेतृत्वाला आव्हान देउन राजकीय प्रगती ला ब्रेक देण्याचे काम जिल्हा परीषद सदस्य लक्ष्मण ठक्करवाड यांनी केले. हायगले या लिंगायताच्या नेतृत्वाला कोंडीत पकडण्याचे काम ठक्करवाड यांनी केले.
मागील जि.प.निवडणूकीत लोहगांव व आरळी जि.प. गटात दावेदार असलेल्या लिंगायत समाजाच्या उमेदवारांना डावलुन स्वतः च उमेदवारी घेऊन लिंगायत समाजावर अन्याय करण्याचे कारस्थान  ठक्करवाड यांनी केले. अशा या कावेबाज व लिंगायत समाजाचे हितशञु असलेल्या लक्ष्मण ठक्करवाड यांचा बसव ब्रीगेड च्या वतीने जाहीर निषेध करणा-यात आला आहे. कासराळी ग्रामपंचायती च्या सरपंच सो.हायगले यांच्यावर अविश्वास आ णुन लिंगायत समाजाच्या मतावरच मोठे झालेल्या ठक्करवाड यांनी बेईमानी केली. असा आरोप करुन ठक्करवाड यांच्या स्वार्थी राजकारणाचा  बसव ब्रिगेड ने जाहीर निषेध करीत असल्याचे पञक बसव ब्रिगेड चे जिल्हा संघटक शंकर महाजन , तालुकाध्यक्ष गिरीराज बामणे यांनी  प्रसिद्धीस दिले  आहे.