नागभिड तालुक्यात अस्वलाच्या हल्यात 3 ठार

0
15

चंद्रपूर,दि.13:- जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील आलेवाही रेल्वे स्टेशनजवळीस खरकाडा जंगलात तेंदूपत्ता तोडणीसाठी गेलेल्या ग्रामस्थांवर अस्वलाने केलेल्या हल्यात 3 जणांचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळच्या सुमारास घडली. मृतामध्ये बिसन कुळमेथे (५५), फारुख शेख(३२) आणि रंजना राऊत(३५) यांचा समावेश आहे.अस्वलाने वेगवेगळ्या ठिकाणी हल्ला केला यामध्ये 3 ग्रामस्थ गंभीर जखमी असून त्यांना उपचारासाठी चंद्रपूरला हलविण्यात आले आहे.सदर घटनेनंतर वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.