महाराष्ट्राच्या 11 कोटी 20 लाख जनतेच्या आशीर्वादाने मी सुखरुप – मुख्यमंत्री

0
5

लातूर, दि. 25 – निलंग्याहून मुंबईकडे येत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हेलिकॉप्टर कोसळले. मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत हेलिकॉप्टरमध्ये असलेले पाचही जण सुरक्षित आहेत. तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. उड्डाण भरताच हेलिकॉप्टर हेलिपॅडवरच कोसळलं. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुरक्षित आहेत.अपघातानंतर मुख्यमंत्र्यांनी लगेचच ट्विटरच्या माध्यमातून आपण सुरक्षित असल्याची माहिती दिली. ”मी आणि माझी टीम संपूर्णतः सुरक्षित आहे. कोणतीही काळजी करण्याचं कारण नाही’, असं ट्विट त्यांनी केलं. तसंच यानंतर व्हिडीओच्या माध्यमातून ”माझ्या पाठिशी महाराष्ट्रातील जनतेचा आशीर्वाद. काही काळजीचं कारण नाही, मी सुखरुप आहे’, अशी प्रतिक्रियादेखील दिली.