बेळगावला निघालेल्या दिवाकर रावतेंना पाठवलं माघारी

0
4

कोल्हापूर, दि. 25 – बेळगावमधील मराठी भाषकांच्या मोर्चात सहभागी होण्यासाठी निघालेले परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना सीमाभागातील कोगनोळी नाक्यावर बेळगाव पोलिसांनी अडवले. बेळगाव पोलिसांनी जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेली जिल्हा बंदीची नोटीस रावते यांना दिल्यानंतर रावते आपल्या समर्थकांसह माघरी फिरले. त्यामुळे बेळगाव प्रश्नासाठी निघालेल्या शिवसैनिकांना बेळगावात पोहोचताच आले नाही.कर्नाटक सरकारच्या दडपशाहीविरोधात बेळगावातील मराठी जनतेकडून काढण्यात येणाऱ्या मोर्चात सहभागी होण्यास शिवसेना नेते दिवाकर रावते यांना परवानगी नाकारली आहे. रावते या मोर्चात सहभागी होण्यासाठी कोल्हापूरहून बेळगावच्या दिशेने रवाना झाले होते. मात्र, कागलमधील कोगनोळी फाट्याजवळ कर्नाटक पोलिसांकडून रावते यांच्या गाड्यांचा ताफा अडवला.

यावेळी पोलिसांकडून दिवाकर रावते आणि संजय पवार यांना कन्नड भाषेतील जिल्हाबंदीच्या नोटीस देण्यात आल्या. बेळगाव पोलिसांनी ठाम भूमिका घेतल्याने दिवाकर रावते यांना पुन्हा कोल्हापूरच्या दिशेने परतावं लागलं.