राज्यमंत्री दिलीप कांबळे यांचा मराठी पत्रकार संघाकडून निषेध

0
13

नांदेड दि.२९-सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप कांबळे हे जिल्ह्यातील एका संवाद यात्रेच्या कार्यक्रमानिमित्त मार्गदर्शन करताना पत्रकारावंर घसरले आणि अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. कांबळे यांनी तात्काळ पदाचा राजीनामा देऊन पत्रकारांची माफी मागावी अशा प्रकारचे निवेदन जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांच्याकडे नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्यावतीने देण्यात आले.

हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी राबविण्यात येत असलेल्या संवाद यात्रे दरम्यान पत्रकारांविषयी अपशब्दासह अर्वाच्च भाषेचा वापरही केला. मी कोणाला घाबरत नाही, संपादक असो की, पत्रकार असो व पत्रकारांना पाकीटे दिली की, ते कोणाचेही छापतात आज आमचे आहेत उद्या कोणाचेही होतात, असे म्हणून थेट त्यांनी संपादकांवर हल्ला चढवत अर्वाच्च भाषेचाही वापर केला. यामुळे नांदेड मराठी पत्रकार संघाच्यावतीने त्यांचा निषेध व्यक्त करीत कांबळे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली.तसेच यासंबधी जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांच्याकडे निवेदन सादर केले. यावेळी मराठी पत्रकार संघाचे विभागीय सचिव विजय जोशी, जिल्हाध्यक्ष प्रकाश कांबळे, महानगराध्यक्ष पंढरीनाथ बोकारे, महानगर सचिव सुनील पारडे, सहसचिव प्रशांत गवळे, विश्वनाथ देशुमख, गोपाळ देशपांडे, चारूदत्त चौधरी, नागनाथराव देशमुख, बजरंग शुक्ला, प्रकाश नागला, संगमेश्वर बाचे, रविंद्र कुलकर्णी, प्रल्हाद लव्हेकर, महेंद्र देशमुख, अविनाश पाटील, नरेंद्र गडप्पा, माधव अटकोरे, सुभाष लोणे, कमलाकर बिराजदार, हरीहर धुतमल, प्रभाकर लखपत्रेवार, दिपंकर बावस्कर, आझम बेग, कुवरचंद मंडले, संजय सुर्यवंशी, गौतम गळेगावे, सदाशिव गच्चे, राहुल गजेंद्रगडकर, निळकंठ वरळे यांच्यासह आदींची यावेळी उपस्थिती होती