मोदींनी ३ वर्षाच्या विजयाची फसवी गुढी उभारली;भंडाऱ्यात काँग्रेसच धरणे आंदोलन

0
12

भंडारा, दि.२९ मे – ढासळलेली अर्थव्यवस्था, वाढती बेरोजगारी, शेती आणि उद्योगांची पीछेहाट अश्या पार्श्वभूमीवर मोदी सरकार ३ वर्षाचा जल्लोष साजरा करीत आहे. युवकांच्या स्वप्नांचा चुराडा करून, शेतकरी आणि जवानांच्या बलिदानातून, महिला आणि दलितांच्या असुरक्षितेतून, देशातील बंधुभाव आणि सद्भावनेला पायदळी तुडवून, जाती-पाती मध्ये विद्वेषाची दरी उभी करू मोदींनी ३ वर्षाच्या विजयाची फसवी गुढी उभारली आहे. अशा प्रकारचे निषेधात्मक धरणे आंदोलन करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना  जिल्हाधिकारी यांच्या मार्फत माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबांधे, जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर,जिल्हापरिषदेचे अध्यक्ष भाग्यश्री गिरोलकर, प्रमोद तितिरमारे, मनोहर सिंगनजुडे, महेंद्र निंबार्ते यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले. धरणे आंदोलनात नेत्यांचे समयोचित भाषणे झाले. यात प्रामुख्याने धनराज साठवणे, मंगेश हुमने, प्रमोद तितिरमारे, अमर रगडे, प्राध्यापक मारबते, राजकपूर राऊत, भूमेश्वर महावाडे, स्वाती निमजे, के के पंचबुद्धे, अजय गडकरी, प्रशांत देशकर, मनोहररावजी शिंगनजुडे, माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबांधे, जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर,जिल्हापरिषदेचे अध्यक्ष भाग्यश्री गिरोलकर सहभागी झाले होते.  काँग्रेसचे माजी आमदार सेवक वाघाये या आंदोलनात मात्र कुठेच दिसून आले नाही.

देशातील सर्वसामान्य नागरिकांना भूलथापा देऊन केंद्रामध्ये नरेंद्र मोदी सरकार सत्तेवर आले. हे सरकार सत्तेवर येऊन तीन वर्ष झाले आहेत. परंतु, निवडून येण्यापूर्वी मोदी यांनी जनतेला जी आश्वासने दिली, ती आश्वासने पूर्ण होऊ शकलेली नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस जनतेला केवळ गाजर दाखविण्याचे काम करीत आहे. शेतकरी रोज आत्महत्या करीत असून महागाई वाढली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचा भारतीय जनता पक्षवरील तसेच सरकारवरचा विश्वास उडाला आहे. भाजप सरकार नागरिकांचे प्रश्न सोडविण्यात अपयशी ठरले आहे. येत्या काळात जनता भाजपला धडा शिकवेल. अभिनय संपन्न भाषणातून आणि खोट्या प्रचारातून देशातील जनतेची फसवणूक केली आहे. भाजपच्या ३ वर्षांपूर्वीचा जनाधार आता संपत चालला आहे. मोदी सरकार आपला ५ वर्ष्याच्या कार्यकाळ देखील पूर्ण करील किंवा नाही; याची खात्री नाही. जनतेच्या भावनांशी खेळणाऱ्या भाजप सरकारला एक दिवस देखील सत्तेवर राहण्याचा अधिकार राहिला नसल्याचे म्हटले. निवेदन देतांना माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबांधे, जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर,प्रमोद तितिरमारे, जिल्हापरिषदेचे अध्यक्ष भाग्यश्री गिरोलकर, मनोहर सिंगनजुडे, महेंद्र निंबार्ते, विनायक बुरडे, धनराज साठवणे, राजकपूर राऊत, सचिन घनमारे, अमर रगडे, शंकर राऊत, भूमेश्वर महावाडे, नीलकंठ कायतें, प्रेम वणवे, अनिक जमा पटेल, गणेश निमजे, सौ स्वाती निमजे, मंगेश हुमने, भावना शेंडे, छाया पटले, जनार्धन निंबार्ते, दिनेश बोन्द्रे, प्रा मारबते, प्रीती बागडे, मिसाराम चोपकर, स्नेहल रोडगे,प्रवीण भोंदे, हि ल लांजेवार, आशिष पात्रे, के के पंचबुद्धे, एस टी गिऱ्हेपुंजे, अस्विन नाशिने, संजय वर्गनटीवार, अरुण श्रीपाद, सौ सुषमा वर्गनटीवार, दिनेश गिऱ्हेपुंजे, सचिन फाले, विवेक गायधने, इत्यादी प्रामुख्याने उपस्थित होते. धरणे आंदोलनाचे संचालन महेंद्र निंबार्ते यांनी तर आभार प्रदर्शन अजय गडकरी यांनी केले.