आ.भा.भ्र.नि.संघटनेच्या प्रदेश सरचिटणीस पदी राजु पाटील यांची निवड

0
23

बिलोली,दि.30 : आखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समितीचे कार्येरत विभागीय अध्यक्ष राजू पाटील शिंपाळकर यांच्या कार्याची योग्य ती दखल घेऊन राष्ट्रीय अध्यक्ष मा.प्रदिप पाटिल खंडापुरकर यानी नांदेड येथे एका आयोजित बैठकीत शिंदे यांची महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी निवड करण्यात आले असल्याचे जाहीर केले.
राजू पाटील हे बिलोली तालुक्यात सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात त्यांनी काही वर्षापुर्वी पत्रकारितेच्या माध्यमातून सुध्दा सामाजिक कार्य करीत आहेत याबरोबरच गेल्या दोन ते तीन वर्षापासून समितीमध्ये कार्य करीत आसताना त्यांच्या विविध क्षेत्रांतील कार्याची वेळोवेळी दखल घेत समितिच्या वतिने वेगवेगळ्या पदावर त्यांना पदन्नोती देण्यात आली . गेल्या एक वर्षापूर्वी पासुन विभागिय अध्यक्ष पदाचा पदभार सांभाळत आसताना आनेक भ्रष्ट बाबीवर वाच्छता फोडण्यासाठी विविध माध्यमातुन प्रशासन दरबारी संघर्षाची करून अनेक प्रश्न मार्गी लावले सदर कार्याची दखल घेऊन समितिचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदिप पाटिल खंडापुरकर यांनी नुकतेच नांदेड येथे समितिच्या एका आयोजित बैठकीत महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी राजू पाटील यांची निवड करण्यात आले असल्याचे जाहीर केले यावेळी प्रदेश उपाध्यक्ष आमरजितसिंग काँलरा,प्रदेश सेक्रेटरी राजु भारतीया,विभागिय अध्यक्ष रामदास गिरे पा.जिल्हाअध्यक्ष बाळासाहेब कदम ,युवाजिल्हा अध्यक्ष योगेश सुर्यवंशि,आदि मान्यवर पदाधिकारी व कार्येकर्ते उपस्थित होते या निवडी बद्दल सर्व पदाधिका-यांनीसह , राजकीय, ,सामाजिक ,शैक्षणिक व पत्रकार क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी आभिनंदन केले.