ओबीसी मंत्रालयाचे काम आठ दिवसात कार्यान्वित करा-प्रा.राम शिंदे

0
12

मुंबई, दि. 5 : राज्यात नव्याने निर्माण करण्यात आलेल्या ओबीसी मंत्रालय( विमुक्त जाती,भटक्या जमाती, इमाव, विशेष मागास प्रवर्ग कल्याण) विभागातील नवीन पदे
भरणे, कार्यालयासाठी जागा निश्चित करणे व इतर सर्व प्रक्रिया आठ दिवसात पूर्ण करून विमुक्त जाती, भटक्या जमाती, इमाव, विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभाग कार्यान्वित करण्याचे निर्देश विमुक्त जाती, भटक्या जमाती,इतर मागास वर्ग, विशेष मागास प्रवर्ग कल्याण मंत्री प्रा. राम शिंदे यांनी दिले.
विमुक्त जाती, भटक्या जमाती, इमाव, विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभागाचा आढावा घेण्यासाठी आज आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला वित्त विभागाचे सचिव गिरीराज सिंह, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव मुकेश खुल्लर, विजा, भजा, इमाव, विमाप्र कल्याण विभागाचे सचिव दिनेश वाघमारे आदींसह इतर अधिकारी उपस्थित होते.