मेक इन इंडियांतर्गत उत्पादित मिनीटमेड पल्पी मोसंबी ज्यूसचे अनावरण

0
8

मुंबई, दि. 5 : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबरोबरच तो पुन्हा कर्जबाजारी होणार नाही, यासाठी राज्य शासन प्रक्रिया उद्योगाला चालना देणार आहे. कृषी क्षेत्राच्या शाश्वत विकासासाठी शेतील उद्योगांशी जोडणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
कोकाकोलाच्या मिनीटमेड (Minute maid) पल्पी मोसंबी ज्यूसचे अनावरण मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृहात झाले.यावेळी मोर्शीचे आमदार डॉ. अनिल बोंडे, कोकाकोलाचे भारत आणि दक्षिण पश्चिम आशिया विभागाचे अध्यक्ष टी. कृष्णकुमार, जैन इरिगेशन चे अध्यक्ष अशोक जैन, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, बीईसी फूडचे व्यवस्थापकीय संचालक विनू जैन, फ्रुट सर्क्युलर इकॉनॉमीचे भारतातील उपाध्यक्ष असीम पारेख, कोकाकोलाचे इश्तियाक अहमद, अर्पण बासू, वासन शुक्ल
आदी उपस्थित होते. या कार्यक्रमास जळगाव, औरंगाबाद, जालना तसेच विदर्भातील मोसंबी उत्पादक शेतकरी उपस्थित होते.