आरटीई’ आदेशाला ‘ केंब्रिज’ चा खो ! पालकांचे उपोषण सुरु

0
7

नरेश तुप्तेवार

नांदेड,दि.०५: शिक्षण हक्क कायद्यान्वये आरक्षणाच्या कोट्यातून चौथीपर्यंत मोफत शिक्षण घेतलेल्या मागासवर्गीय विद्याथ्र्यांना केंब्रिज विद्यालयाने पाचव्या वर्गात प्रवेश देण्यासाठी शैक्षणिक शुल्काची मागणी केली आहे. त्यामुळे चौथीतील उत्तीण विद्याथ्र्यांचे भविष्य अधांतरी झाले आहे. पाल्याला पाचवीच्या वर्गात मोफत प्रवेश देवून आठवी पर्यंत मोफत शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, या मागणीसाठी चौथी वर्गातील उत्तीर्ण झालेल्या पाल्यांच्या पालकांनी जिल्हा परिषदेसमोर सोमवारपासून बेमुदत उपोषण सुरु केले आहे.

शिक्षण हक्क कायदा २००९ नुसार इंग्रजी माध्यमाच्या शाळेत आरक्षणाच्या कोट्यातून मागासवर्गीय पाल्यांना आठवी पर्यंत मोफत शिक्षण देण्याची तरतूद असतांना शहरातील केंब्रिज प्राथमिक विद्यालयाने शासनाच्या आरटीई आदेशाला केराटी टोपली दाखवली आहे. मागासवर्गीय विद्याथ्र्यांना २०१२-१३ या शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिलीत आरटीई नुसार केंब्रिज प्राथमिक विद्यालयात प्रवेश मिळाला होता. ही मुले यंदा चौथीची परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. पण त्यांना पाचव्या वर्गात प्रवेशासाठी शैक्षणिक शुल्क मागितले जात आहे. त्यामुळे या विद्याथ्र्यांच्या शिक्षणाचा प्रश्न गंभीर झाला आहे. या संदर्भात प्राथमिकचे शिक्षणाधिकाऱ्यांनी केंब्रिजला पत्राद्वारे मोफत प्रवेश देण्याचे निर्देश दिले होते. पण केंब्रिजने आदेशाला केराची टोपली दाखवून आपली भूमिका कायम ठेवली. पाल्याला पाचवीच्या वर्गात मोफत प्रवेश देवून आठवी पर्यंत मोफत शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, या मागणीसाठी चौथी वर्गातील उत्तीर्ण झालेल्या पाल्यांच्या पालक राहूल वाघमारे, संजय गायकवाड, विलास वाघमारे, श्रीरंग एडके, नरेंद्र वाघमारे, उत्तम खंदारे, मनोहर महागडे, राहूल किनीकर यांनी जिल्हा परिषदेसमोर सोमवारपासून बेमुदत उपोषण सुरु केले आहे.