धुळे उप मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा प्रताप, आमदारांना लाच देताना रंगेहाथ पकडले

0
12
धुळे, दि. 7 :- डेप्युटी CEO ने चक्क आमदारालाच लाच देण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार जिल्ह्यात उघड झाला आहे. आमदारांची पंचायत राज समिती दौऱ्यावर होती. समितीने कापडाने गावातील पोषण आहाराच्या बाबतीत तपासणी केली असता बऱ्याच त्रुटी आढळून आल्या होत्या.
त्यावर आज सुनावणी झाली. त्यानंतर धुळे जिल्हा परिषदेचे डेप्युटी CEO तुषार माळी यांनी शिवसेनेचे आमदार हेमत पाटील यांना फोन करून तुम्हाला मला भेटायचे आहे, प्रेमाची भेट द्यायची आहे असे सांगितले.
आमदार हेमंत पाटील यांनी तुषार माळी यांना बोलावून घेतले. आपण केलेल्या चोकशीचा अहवाल सकारात्मक करावा म्हणून माळी यांनी विनंती केली आणि एक पाकीट दिले. त्यानंतर आमदार पाटील यांनी लाच लुचपत विभागाला ही बाब कळवली. पथकाने धाड टाकून तपासणी केली असता पाकिटात दीड लाख रुपये होते. प्रकरण दाबून टाकण्यासाठी आमदार हेमंत पाटील यांना तुषार माळी यांनी दीड लाखाची लाच देण्याचा प्रयत्न केला होता. याआधी उपमुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रावंदल यांना लाच घेताना अटक करण्यात आली होती.