चंद्रपुरात शिवसेनेचे धरणे आंदोलन

0
12

चंद्रपूर,दि.07- सरकार ने कर्जमाफी झालेल्या शेतक-यांची यादी जाहीर करावी या मागणी साठी आज शिवसेनेतर्फे चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बैंकेसमोर ढोल वाजवा आंदोलन केले. या आंदोलनात आमदार बाळू धानोरकर यांच्या नेतृत्वात शेकडो शिवसैनिक सामील झाले होते. शिवसेनेच्या मते भाजपने ३४ हजार कोटींचे कर्ज माफ केल्याची घोषणा केली. कर्जमाफीचे पोस्टर लावले मात्र हे फक्त श्रेय घेण्यासाठी सुरु आहे. एकीकडे मुख्यमंत्री मुंबई सारख्या शहरात कर्जमाफी झालेल्या शेतक-यांचे आकडे जाहीर करतात. मात्र दुसरीकडे वर्धा जिल्हा कर्जमाफीत निरंक दाखवतात. त्यामुळे आता सरकारने शेतकऱ्यांची यादी बैंकेसमोर लावून हा गोंधळ संपवावा अशी मागणी करण्यात आली. या वेळी शिवसैनिकांनी नागपूर-चंद्रपूर हा महामार्ग काही वेळ रोखून धरला आणि बैंकेत घुसण्याचा प्रयत्न देखील केला.