अँड.प्रकाश आंबेडकरांवरील भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ बिलोलीत रास्ता रोको

0
16

बिलोली/नांदेड,दि.11- भारीप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांच्या गाडीवर भाजप कार्यकर्त्यांनी मध्यप्रदेशातील महू येथे भ्याड हल्ला केला होता. महू येथील विज्ञान विद्यापीठातील एका कार्यक्रमात अँड.बाळासाहेब सहभागी झाले होते. हे कार्यक्रम आटोपून बाहेर पडताच भाजपच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली. तसेच त्यांना काळे झेन्डे दाखविण्यात आले.
देशभरात दलितांवरील होणारे अन्याय अत्याचाराचे सत्र चालू असताना महामाणव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या वंशजावर हा हल्ला होन म्हणजे राज्यात अशांततेला निमंत्रण दिल्यासारखे आहे. या निंदनीय प्रकारामुळे तमाम बहूजनाच्या भावना दूखावल्याने त्याचे तीव्र पडसाद बिलोलीमध्ये ही पाहावयास मिळाले.सर्व पक्ष व संघटनाच्या वतीने बिलोली तहसील कार्यालयासमोर रास्ता रोको करण्यात आला. याप्रसंगी नायब तहसीलदार डॉ.गौन्ड यांना निवेदन देण्यात आले.लवकरात लवकर दोशिंवर कारवाई करून त्यांना तात्काळ अटक करण्यात यावे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी आंदोलन कर्त्याकडुन देण्यात आला. यावेळी विविध पक्षासह अनेक सामाजिक संघटनानी सहभाग नोंदविला होता. या रास्ता रोको आंदोलनात भारीपचे संजय जाधव,भारीपचे ता.अध्यक्ष धम्मदीप गावंडे, मुन्ना पोवाडे, वारणेचा वाघ संघटनेचे संविधान दुगाने, भगवान प्रचंड, संदेश जाधव, संजय पोवाडे, धम्मपाल जाधव, प्रकाश पोवाडे, सुरेश देवकरे, सुनील मोरे, संघपाल पोवाडे, दिलीप घाटे, कुणाल सोनकांबळे, किर्तिराज अग्रारे, मारोती श्रीगीरे, रमेश पोवाडे, सुरेश गोणेकर, मारोती भालेराव, प्रेम घाटे, रमेश पोवाडे, राजू कुडकेकर, शिलरत्न जाधव, डी.टी सूर्यवंशी, प्रल्हाद वाघमारे, सुनील जेठे, यासह शेकडो कार्यकर्ते व समाज बांधव यावेळी उपस्तीथ होते.