मत्स्य उत्पादनात राज्याला स्वयंपूर्ण करा-मंत्री महादेव जानकर

0
24

मुंबई,दि.10: नागपूर विभागात राबविण्यात आलेल्या तलाव तेथे मासोळी या योजनेच्याच धर्तीवर राज्यात मत्स्ययुक्त तलाव योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेव्दारे राज्यातील मत्स्यबीज आणि मत्स्य उत्पादन वाढवावे, अशा सूचना पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्य व्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी दिल्या.
राज्यात नीलक्रांती योजनेचाच भाग असलेली मत्स्ययुक्त तलाव ही योजना व्यापक प्रमाणावर राबविण्यात येणार आहे. योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी गठीत करण्यात आलेल्या समितीच्या सदस्यांची बैठक मंत्रालयात घेण्यात आली, यावेळी मंत्री जानकर बोलत होते.मत्स्ययुक्त तलाव योजना राज्यात कशाप्रकारे राबवावी, दर्जेदार मत्स्यबीज निर्मिती आपल्याच राज्यात व्हावी, मत्स्यबीज उत्पादन करणा-या नर्सरी तयार कराव्या, बोटुकलीचे उत्पादन वाढवावे, अशा सूचना मंत्री महादेव जानकर यांनी दिल्या. तसेच याबाबत सर्वांच्या सूचना त्यांनी ऐकून घेत लवकरच पुन्हा बैठक बोलविण्याचे निर्देश दिले.