तुमसर लॉयन्स क्लब कार्यकारीणीचा शपथग्रहण

0
6

तुमसर,दि.10-लॉयन्स क्लब तुमसरचे सन २०१७-१८ चे नवनियु्नत अध्यक्ष लॉ. राजेश पारधी, तथा त्यांच्या अध्यक्षतेखालील नवीनकार्यकारीणीचा शपथग्रहण स्थानिक शकुंतला सभागृहात पार पडला.त्यांनी क्लबचे ५२ वे अध्यक्ष म्हणून पदग्रहन केले. यावेळी समारोहाचे मुख्य अतिथी व शपथविधी अधिकारी प्रर्व प्रांतपाल लॉ. विजय पालीवाल, यांनी नवनियु्नत अध्यक्ष राजेश पारधी, सचिव लॉ. किरणकुमार जायस्वाल, कोषाध्यक्ष सतिश रेकावार, तसेच सदस्यांना शपथ दिली. यावेळी उपप्रांतपाल लॉ. जीवनचंद्र निर्वाण यांनी लॉ. नरेंद्र पटले यांना नविन सदस्याच्या रूपात शपथ दिली. द्विप प्रज्वलनानंतर पुष्पगुच्छ देवून सर्व सन्माननिय पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. समारोहात रिजनल चेअरमन सूर्यनारायण qसह, झोन चेअरमन अजय यादव, वरिष्ठ लॉयन ललीतकुमार थानथराटे यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. ध्वजवंदन लॉ. रत्नमाला लांजे यांनी प्रस्तूत केले. पाहुण्यांचा परिचय लॉ. कल्यानी भुरे व लॉ. आशिष कुकडे यांनी करून दिले. याप्रसंगी स्थानिक शासकिय रूग्णालयाला वॉल्कर भेट देण्यात आला. डॉ. सुधाकर धकाते यांनी वॉल्कर स्विकारला.