शेतमजुरांच्या मृत्यू प्रकरणी किटनाशक कंपनी व विक्रेत्यांसह शासनावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा नोंदवा-मुंडे

0
11

यवतमाळ दि. 8 -यवतमाळ जिल्ह्यासह इतर जिल्ह्यात शेतकरी शेतमजुरांच्या विषबाधेमुळे झालेल्या मृत्यू प्रकरणी किटनाशक कंपनी व विक्रेतेसह शासनावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी पत्रपरिषदेत केली.ते यवतमाळे येथे आज अाले असता त्यांनी ही मागणी केली. यावेळी आमदार मनोहर नाईक माजी आमदार संदीप बाजोरिया उपस्थित होते. राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या वतीने मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटूंबियांना प्रत्येकी 10 हजार मदतीची घोषणा करण्यात आली.

कीटकनाशकांच्या फवारणीमुळे 22 शेतकरी शेतमजुरांच्या मृत्यू होतो, हे अतिशय गंभीर प्रकरण असून नुसत्या चौकशीच्या घोषणा शासनाचे मंत्री करीत आहेत. यावरून शासन याप्रकरणी केवळ टोलवाटोलवीचे काम करुन किटनाशक कंपन्या विक्रत्यांना पाठीशी घालण्याचे काम करीत आहे.त्यामुळे यांना वाचविणारे अधिकारी यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा अशी मुख्य मागणी असून जो पर्यंत त्यांच्यावर गुन्हे दाखल होत नाही. तोपर्यंत आमचा पाठपुरावा सुरूच राहिणार असल्याचे आ.मुंडे म्हणाले. 22 शेतकऱ्यांचे शेतमजुरांचे बळी गेले त्यानंतर केवळ 5 कृषी विक्रेत्यांवर कारवाई झाली.त्यावरून या कृषी विक्रेत्यांना औषधी बनविण्याच्या कंपन्यांना सरकार पाठीशी घालत आहे, असा आरोप त्यांनी केला. कृषिमंत्री विदर्भातील पण ते उशिरा आले मुख्यमंत्री विदर्भातील पण त्यांना अजूनही यवतमाळला येण्यास वेळ नाही. त्यावरून त्यांना शेतकऱ्याप्रती किती काळजी आहे हे दिसून येते. बोगस बियाणे आले कीटकनाशक आले त्याची विक्री झाली यासर्व घडामोडीत मोठा आर्थिक व्यवहार झाला असून त्याची चौकशी होणे महत्वाचे असल्याचेही मुंडे म्हणाले.त्यापुर्वी त्यांनी रुग्णालयात जाऊन उपचार घेत असलेल्या शेतकरी व शेतमजुराची भेट घेतली.केवळ 2 लाख नाही तर 10 लाखाची मदत शासनाने जाहीर करावी असेही मुंडे म्हणाले.