पोलिसांच्या सतकर्तने गर्भवती महिला पोचली रुग्णालयात

0
9

आलापल्ली,दि.8 : भामरागड तालुक्यातील हलवेर गावातील एका गरोदर महिलेला प्रसुतीसाठी रुग्णालयात जाण्यास कुठलेही साधन उपलब्ध होत नसल्याचे गावात गेल्यावर लक्षात आलेल्या नारगुंडा पोलीसांच्या जवांनी वाहनाची व्यवस्था करु सदर महिलेला हेमलकसा येथील रुग्णालयात वेळेच पोचविले. नारगुंडा पोलीस मदत केंद्राचे पोलीस जेव्हा गावात पोहचले, तेव्हा गरोदर महिला पाली मधु कुमोटी प्रसुतीच्या वेदना सहन करु शकत नव्हती अशी परिस्थिती होती.त्यावेळी कुठल्याही क्षणाचा विलंब न करता तत्काळ दुसर्या वाहनासाठी नारगुंडा येथे संपर्क करुन त्या वाहनाने रुग्णालयात सुखरूप पोचविण्यात आले.पोलिसांच्या या भूमिकेबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.