अकोल्यात 14 कोटींचा अवैध कीटकनाशक साठा जप्त

0
8

अकोला दि.११ :: कीटकनाशक फवारणी करताना शेतकऱ्यांचा विषबाधा होऊन मृत्यू झाल्यानंतर कृषी विभागाला खडबडून जाग आली आहे. अवैध कीटकनाशकांच्या साठ्याविरोधात सुरु केलेल्या कारवाईत कृषी विभागाने अकोल्यात दोन दिवसात 14 कोटी 31 लाख रुपयांचा साठा जप्त केला आहे.अकोला जिल्ह्यात कृषी विभागाच्या भरारी पथकाकडून कीटकनाशकांच्या अवैध साठ्यांवर धडक कारवाई सुरु आहे. दोन दिवसांच्या गोपनीय कारवाईत आतापर्यंत 14 कोटी 31 लाख रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे. अकोला जिल्ह्यात आतापर्यंत विषबाधा होऊन 9 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे.फवारणी करताना विषबाधा होऊन विदर्भात आतापर्यंत 30 पेक्षा जास्त शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कृषी विभागाने अवैध कीटकनाशक साठ्याविरोधात कडक पावलं उचलली आहेत. शिवाय राज्य सरकारने चिनी फवारणी पंप वापरण्यावरही बंद घातली आहे.