ओबीसी युवा महासंघाचे २० डिसेंबरला नागपूर येथे विद्यार्थी अधिवेशन

0
14

गडचिरोली,दि.03 :देशभरातील ओबीसी संघटनांची राष्ट्रीय ओबीसी महासंघासोबत एकजूट होत असल्याची जाणीव केंद्र सरकारला दिल्ली येथे पार पडलेल्या ७ ऑगस्टच्या दुसऱ्या राष्ट्रीय महाधिवेशनामुळे झाली. त्यामुळेच नॉनक्रिमिलेअरची मर्यादा सहा लाखांहून आठ लाखांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, राज्यघटनेत अशी कुठलीच तरतूद ओबीसींसाठी नसल्याने ही असंवैधानिक अट रद्द करण्याच्या मागणीवर ओबीसी महासंघ ठाम असून राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघ,ओबीसी विद्यार्थी संघटना व ओबीसीत मोडत असलेल्या सर्व जात संघटनाच्यावतीने येत्या २० डिसेंबरला ओबीसी युवक,युवती,विद्यार्थी व विद्यार्थिनींचे राज्यअधिवेशन नागपूरच्या धनवटे नॅशनल काॅलेजच्या सभागृहात आयोजित करण्यात आले आहे.

ओबीसी समाजातील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांवर होणाऱ्या अन्याय रोखण्याकरिता वारंवार निवेदने देण्यात येतात,परंतु  सरकार कुठलीही ठोस भूमिका घ्यायला तयार नसल्याने युवक,युवती,विद्यार्थी,विद्यार्थींनीना संघटित करुन युवा शक्तीच्या माध्यमातून सरकारला ओबीसींच्या न्याय हक्काच्या मागण्या मंजूर करवून घेण्यासाठी आयोजित या अधिवेशनात सर्वांना सहभागी होण्याचे आवाहन राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष, विदर्भ विभाग विद्यार्थी प्रतिनिधी रुचीत वांढरे यांनी केले आहे. या अधिवेशनात ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना जाहीर करावा , नॉन क्रिमिलेअर ही जाचक अट कायमस्वरूपी रद्द करण्यात यावी , ओबीसी विद्यार्थ्यांना तालुका स्तरावर, जिल्हा स्तरावर वसतिगृहाची निर्मिती करण्यात यावी , ओबीसी विद्यार्थ्यांना  MPSC / UPSC  मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात यावे , ओबीसी विद्यार्थ्यांकरिता स्वाधार योजना चालू करावे, ओबीसी समाजासाठी केंद्रात स्वंतत्र मंत्रालय स्थापण करणे.मंडल आयोग,नच्चीपन आयोग व स्वामीनाथन आयोगाच्या सर्व शिफारशी लागू करण्यात यावे  आदी मागण्यांचा समावेश राहणार आहे.या मागण्यासांठी विद्यार्थ्याांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन तुषार वैरागडे , शुभम भस्मावर , पंकज खोबे, राहुल भांडेकर , महेश उरकुडे , शुभम खोडवे , युगंधर भोयर , पंकज धोटे , गौरव नागपूरकर , कमलेश बारस्कर , सागर वाढई , वैभव कांबळे , परमानंद पुनमवार , अक्षय ठाकरे , सुरज डोईजळ , चेतन शेंडे, साईनाथ जेंघटे , प्रीतम ठाकरे , संतोष नैताम , शंकर जगन्नाथ , राहुल कोसरे , स्वप्नील घोसे यांनी केले आहे.

रुचित वांढरे