भंडारा येथे रविवारी राज्यस्तरीय आंबेडकरी विचार संमेलन

0
14

भंडारा,दि. 3 :सद्याच्या सभोवतीच्या अस्वस्थ वातावरणात शोषित जनसमुहांच्या उत्थानाच्या, आरक्षणाच्या, आर्थिक विकासाच्या संधीच्या, बौद्ध विवाह कायद्याच्या निर्मितीच्या, बौद्ध संस्कृती संवर्धनाच्या आणि सामाजिक शोषणाच्या गंभीर प्रश्नांनी अतिरेकी उच्छाद मांडला आहे. या ज्वलंत धगधगत्या प्रश्नांविषयी आंबेडकरी तत्वप्रकाशात विचारमंथन घडून यावे या हेतूने आंबेडकरी विचार जागृती समितीच्या वतीने भंडारा येथे रविवारी (दि.५) लक्ष्मी सभागृहात एक दिवसीय राज्यस्तरीय आंबेडकरी विचार संमेलन आयोजित करण्यात आले आहे.
उद््घाटन, तीन चर्चासत्र व समारोप असे या संमेलनाचे स्वरूप राहणार असून सकाळी १0 वाजता या संमेलनाचे उद््घाटन केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री ना.. रामदास आठवले करणार असून राज्याचे सामाजिक न्याय मंत्री ना.. राजकुमार बडोले हे प्रमुख अतिथी राहणार आहेत. राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य माजी न्यायमूर्ती सी. एल. थूल हे अध्यक्ष तर समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डी. एफ कोचे हे स्वागताध्यक्ष असणार आहेत.
दुपारी १.३0 वाजता पहिल्या सत्रात आरक्षणाचा प्रश्न, बौद्ध व मागासवगीर्यांच्या सवलती आणि जात प्रमाणपत्रासंबंधीच्या समस्या या विषयावर नाशिकचे माजी न्यायाधीश अनिल वैद्य यांचे, दुपारी २.३0 वाजता दुसर्‍या सत्रात बौद्ध विवाह व वारस हक्क कायद्याची अपरिहार्यता या विषयावर राज्याचे माजी मंत्री व या विषयाचे जाणकार डॉ. नितीन राऊत यांचे, दुपारी ३.३0 वाजता तिसर्‍या सत्रात बौद्ध संस्कृती संवर्धनाचा प्रश्न पवनी येथील उत्खननासंदर्भात या विषयावर प्रवास व पर्यटन विभागाचे संचालक तथा पुरातत्व विभागाचे प्रा. डॉ. प्रियदश्री खोब्रागडे यांचे व्याख्यान होणार आहे. सायंकाळी ४.३0 वाजता सेवानवृत्त आयएएस अधिकारी ई.. झेड. खोब्रागडे यांच्या अध्यक्षतेखाली संमेलनाचा समारोप होणार असून विशेष अतिथी म्हणून पुणे येथील माजी न्यायाधीश बी. जी. कोळसेपाटील व अतिथी म्हणून साहित्यिक व समीक्षक डॉ. अनिल नितनवरे राहणार आहेत.
याप्रसंगी नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येनी उपस्थित राहण्याचे आवाहन स्वागताध्यक्ष डी. एफ कोचे, निमंत्रक व सचिव अमृत बन्सोड, अध्यक्ष जयप्रकाश भवसागर, कार्याध्यक्ष महादेव मेर्शाम, संघटन सचिव इंजि रुपचंद रामटेके, कोषाध्यक्ष इंजि प्रभाकर भोयर, मार्गदर्शक महेंद्र गडकरी, प्रेमसागर गणवीर, राजकुमार गजभिये, डॉ. रवींद्र वानखेडे, मोरेश्‍वर बोरकर, म. दा. भोवते, असित बागडे, एम. डब्ल्यू. दहिवले, राहुल डोंगरे, समाजभूषण डी. व्ही. बारमाटे, गुलशन गजभिये, राजेश बौद्ध, यशवंत उपरीकर, रामचंद्र अंबादे, डी. जी. रंगारी, प्रेम सूर्यवंशी, र%माला वैद्य, अरूण गोंडाणे, माया उके, डॉ. सुनिल जिवनतारे, आशू गोंडाणे, करण रामटेके, बाळकृष्ण शेंडे, अजय तांबे, प्रशांत बागडे, आदिनाथ नागदेवे, सचिन बागडे, आहुजा डोंगरे, पुष्पा मेर्शाम, शिलदिप गजभिये, गौतम कावळे, नरेंद्र बन्सोड, मोरेश्‍वर गेडाम, सीमा बन्सोड, संजय बन्सोड, निर्मला गोस्वामी, हरिश्‍चंद्र दहिवले, लता करवाडे, विनोद रामटेके, सुषमा धारगावे, संघमित्रा सुखदेवे इत्यादींनी केले आहे.