नोटबंदीच्या निषेधार्थ जनता दल युनायटेडची राज्यभर जोरदार निदर्शने

0
18

मुंबई,दि.09 : नोटबंदी एक धोका था, देश लुटने का मौका था’, ‘मोदी सरकार, हाय हाय’, ‘परेशान जनता करे पुकार, मत कर मोदी अत्याचार’, ‘युवा – युवती भरे हुंकार, कहा गया हमारा रोजगार’, ‘मोदीजी का कहना साफ, विजय मल्या का कर्जा माफ’ अशा मोदी सरकार विरोधी जोरदार घोषणा देत आज जनता दल युनायटेडच्या कार्यकर्त्यांनी दादर परिसर दणाणून सोडला होता. जदयुचे प्रदेश अध्यक्ष आमदार कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली दादर रेल्वे स्टेशन परिसरात आज नोटबंदीचा निषेध करण्यात आला. कार्यकत्यांनी हातात काळे झेंडे घेऊन घोषणा दिल्या. शरद यादव यांच्या नेतृत्वाखालील जदयुच्या कार्यकर्त्यांनी आज मुंबईसह नागपूर, गडचिरोली, अमरावती, बुलढाणा, उदगीर, पुणे, करमाळा, नाशिक या शहरांसह राज्यभर निदर्शने केली.
८ नोव्हेंबरला  मोदी सरकारच्या नोटबंदीच्या निर्णयाला वर्ष झाले, त्यानिमित्त जदयुचे राष्ट्रीय नेते खासदार शरद यादव यांनी देशभरातील विरोधी पक्षांना काळा दिवस पाळून निषेध करण्याचे आवाहन केले होते, त्याला देशभर उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.
यावेळी आमदार कपिल पाटील म्हणाले, नोटबंदीच्या निर्णयाने देशाची अर्थव्यवस्था उदध्वस्त झाली. या निर्णयाने छोटे व्यापारी, शेतकरी, कामगार, शिक्षक, सामान्य नागरिक परेशान आहे. बेरोजगारी वाढली आणि करोडो तरुणांचे रोजगार बुडाले. मोदी सरकारच्या साडेतीन वर्षाच्या काळात महागाई वाढली, शिक्षणाचे बारा वाजले, सामान्य जनतेत या सरकार विरोधात मोठा असंतोष आहे. तो आज देशभर रस्त्यावर पहायला मिळतोय.