जोशी, कुवळेकर, रायकर यांना टिळक जीवन गौरव पत्रकारिता पुरस्कार : मुख्यमंत्र्यांची घोषणा

0
35

मुंबई : राज्य शासनाचे लोकमान्य टिळक जीवन गौरव पत्रकारिता पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक लक्ष्मण त्र्यंबकराव जोशी, विजय विश्वनाथ कुवळेकर तसेच दिनकर केशव रायकर यांना देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी केली. यासोबतच गेल्या तीन वर्षांतील विविध गटातील उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारदेखील जाहीर करण्यात आले आहेत.

पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम बुधवार, 4 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजता यशवंतराव चव्हाण सभागृह, मुंबई येथे होणार आहे.

लोकमान्य टिळक जीवन गौरव पत्रकारिता पुरस्कार

2011 चे लोकमान्य टिळक पुरस्कारप्राप्त लक्ष्मण जोशी हे सध्या लोकशाही वार्ताचे संपादक असून त्यांनी दै. तरुण भारतमध्ये वार्ताहर पदापासून ते मुख्य संपादक पदापर्यंत काम केले आहे. याशिवाय त्यांनी गोमंतक, गोवादूत, मुंबई तरुण भारत, जळगाव तरुण भारतमध्ये संपादक म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. 45 वर्षांहून अधिक काळ अनुभव असलेले श्री. जोशी यांना तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते पांचजन्य प्रकाशनाचा पुरस्कार मिळाला आहे.

2012 चे लोकमान्य टिळक पुरस्कारप्राप्त विजय कुवळेकर यांनी मुख्य संपादक सकाळ, संपादक लोकमत, मुंबई अशी जबाबदारी सांभाळली आहे. 33 वर्षांहून अधिक काळ पत्रकारितेतला अनुभव असलेले श्री. कुवळेकर यांना जीवन गौरव रत्नदर्पण, बाळशास्त्री जांभेकर, लोकमान्य टिळक, आचार्य अत्रे, कै. सुशीलादेवी देशमुख पुरस्कार मिळाले आहेत.

2013 चे लोकमान्य टिळक पुरस्कारप्राप्त दिनकर रायकर हे सध्या लोकमतचे समुह संपादक आहेत. त्यांनी इंडियन एक्सप्रेसचे मुंबई शहर आवृत्तीचे संपादक, लोकमत आणि लोकमत टाईम्सच्या औरंगाबाद आवृत्तीचे संपादक म्हणून काम पाहिले आहे. त्यांना 50 वर्षांचा पत्रकारितेतला अनुभव असून पुढारीकार ग.गो. जाधव पुरस्कार, सुशीलादेवी देशमुख पत्रकारिता पुरस्कार, रोटरी इंटरनॅशनल पत्रकारिता पुरस्कार, कृषीवलकार प्रभाकर पाटील पत्रकारिता पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

वर्ष 2011, 2012 आणि 2013 चे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार देखील जाहीर करण्यात आले असून विजेत्यांना रोख पारितोषिकाबरोबरच मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देखील देण्यात येईल.

उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार – 2011

बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार (मराठी) बीडच्या दैनिक झुंजार नेताचे विशेष प्रतिनिधी असलेल्या शेख रिजवान शेख खलील यांना (51 हजार रुपये); बाबुराव विष्णू पराडकर पुरस्कार (हिंदी) लोकमत समाचारचे जळगाव प्रतिनिधी मुकेश रामकिशोर शर्मा यांना (41 हजार रुपये); यशवंतराव चव्हाण पुरस्कार शासकीय गट (मराठी) माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मुंबई येथील उपसंपादक इरशाद लतिफ बागवान यांना (41 हजार रुपये); पु.ल. देशपांडे उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार तरुण भारतचे मुंबई ब्युरो चीफ नागेश सुदर्शनराव दाचेवार यांना (41 हजार रुपये); तोलाराम कुकरेजा उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्कार दै. सकाळचे कोल्हापूर येथील वरिष्ठ वृत्तपत्र छायाचित्रकार भिकाजी ज्ञानू चेचर यांना (41 हजार रुपये); दादासाहेब पोतनीस पुरस्कार, नाशिक विभाग, दै. लोकसत्ताचे नाशिक प्रतिनिधी श्रीमती चारुशीला कुलकर्णी यांना (51 हजार रुपये, यापैकी 10 हजार रुपये दैनिक गावकरी यांनी पुरस्कृत); अनंतराव भालेराव पुरस्कार, औरंगाबाद विभाग (लातूरसह) दिव्य मराठी औरंगाबादचे विशेष प्रतिनिधी रवी रामभाऊ गाडेकर यांना (41 हजार रुपये); आचार्य अत्रे पुरस्कार, मुंबई विभाग, ठाणे येथील महाराष्ट्र टाइम्सच्या वरिष्ठ उपसंपादक श्रीमती अमिता शैलेश बडे यांना (41 हजार रुपये); नानासाहेब परूळेकर पुरस्कार, पुणे विभाग गणेश बाळासाहेब कोरे, बातमीदार, दै. सकाळ ॲग्रोवन(41 हजार रुपये); शि.म. परांजपे पुरस्कार, कोकण विभाग, लोकमतचे रत्नागिरी तालुका प्रतिनिधी शिवाजी नामदेव गोरे (41 हजार रुपये), ग.गो. जाधव पुरस्कार, कोल्हापूर विभाग, महाराष्ट्र टाइम्सच्या कोल्हापूर प्रतिनिधी श्रीमती जान्हवी आनंद सराटे (41 हजार रुपये), लोकनायक बापूजी अणे पुरस्कार, अमरावती विभाग, अकोला येथील लोकमतचे वरिष्ठ उपसंपादक, नरेंद्र भीमराव बेलसरे यांना (41 हजार रुपये), ग.त्र्यं. माडखोलकर पुरस्कार, नागपूर विभाग, लोकमतचे, नागपूर येथील उपसंपादक मिलिंद किर्ती यांना (41 हजार रुपये).

उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार – 2012

बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार (मराठी), दै. दिव्य मराठी, सोलापूरचे बातमीदार, म.युसूफ अ.रहिम शेख, (51 हजार रुपये), अनंत गोपाळ शेवडे पुरस्कार (इंग्रजी), पुणे येथील दै. सकाळ टाइम्सचे विशेष प्रतिनिधी शाश्वत गुप्ता रे (41 हजार रुपये), बाबूराव विष्णू पराडकर पुरस्कार (हिंदी), हिंगोली येथील दै. भास्करचे जिल्हा प्रतिनिधी राकेश सुदामाप्रसाद भट्ट (41 हजार रुपये), मौलाना अबुल कलाम आझाद पुरस्कार (उर्दू), दै. इन्कलाबचे मुंबई येथील पत्रकार जमिर अहमद खाँन जलिल अहमद खाँन (41 हजार रुपये), यशवंतराव चव्हाण पुरस्कार, शासकीय गट (मराठी) (माहिती व जनसंपर्क) सांगली येथील माहिती अधिकारी सखाराम राऊ माने, (41 हजार रुपये), पु.ल. देशपांडे उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार, रत्नागिरी येथील टी.व्ही. 9 चे ब्युरो चीफ मनोज प्रभाकर लेले (41 हजार रुपये), तोलाराम कुकरेजा उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्कार मुंबई येथील दै. प्रहारचे छायाचित्रकार अतुल मोहन मळेकर (41 हजार रुपये), केकी मूस उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार शासकीय गट (माहिती व जनसंपर्क), पुणे, विभागीय माहिती कार्यालयातील छायाचित्रकार नितीन उत्तमराव सोनवणे (41 हजार रुपये), दादासाहेब पोतनीस पुरस्कार, नाशिक विभाग भिलाजी दिगंबर जिरे वार्ताहर, दै.सकाळ, धुळे आणि नवनाथ दिघे, प्रतिनिधी, दै.दिव्य मराठी, अहमदनगर यांना विभागून (51 हजार रुपये), अनंतराव भालेराव पुरस्कार, औरंगाबाद विभाग (लातूरसह), बीड येथील दै. तरुण भारतचे जिल्हा प्रतिनिधी भास्कर लक्ष्मण चोपडे (41 हजार रुपये), आचार्य अत्रे पुरस्कार, मुंबई विभाग, मुंबई येथील येथे लोकमतचे वरिष्ठ प्रतिनिधी जमीर दाऊद काझी, (41 हजार रुपये), नानासाहेब परूळेकर पुरस्कार, पुणे विभाग मोहन मारुती मस्कर -पाटील, वार्ताहर, लोकमत, सातारा यांना (41 हजार रुपये), शि.म. परांजपे पुरस्कार, कोकण विभाग, उपसंपादक तरुण भारत बेळगाव, रामकृष्ण महिपत खांदारे यांना (41 हजार रुपये), ग.गो. जाधव पुरस्कार, कोल्हापूर विभाग, कोल्हापूर येथील दै. ॲग्रोवनचे बातमीदार राजकुमार बापूसाहेब चौगुले यांना (41 हजार रुपये), लोकनायक बापूजी अणे पुरस्कार, अमरावती विभाग, बुलडाणा येथील दै. पुण्यनगरीचे उपसंपादक सचिन बलदेव लहाने, (41 हजार रुपये), ग.त्र्यं. माडखोलकर पुरस्कार, नागपूर विभाग, नागपूर येथील लोकमतचे वरिष्ठ उपसंपादक चंद्रशेखर बोबडे यांना (41 हजार रुपये).

उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार- 2013

बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार (मराठी), पुणे येथील दै. सकाळचे विशेष प्रतिनिधी ज्ञानेश्वर पांडूरंग बिजले, (51 हजार रुपये), यशवंतराव चव्हाण पुरस्कार, शासकीय गट (मराठी) (माहिती व जनसंपर्क), औरंगाबाद जिल्हा माहिती अधिकारी रामचंद्र विठ्ठल देठे यांना (41 हजार रुपये), पु.ल. देशपांडे उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार, अमरावती येथील जय महाराष्ट्र न्यूजचे जिल्हा प्रतिनिधी प्रशांत जगनराव कांबळे, (41 हजार रुपये), तोलाराम कुकरेजा उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्कार, मुंबई येथील आफ्टरनूनचे सुशील भोरु कदम, (41 हजार रुपये), दादासाहेब पोतनीस पुरस्कार, नाशिक विभाग अनिकेत वसंत साठे, प्रिन्सिपल करस्पाँडंट, लोकसत्ता, नाशिक (51 हजार रुपये), अनंतराव भालेराव पुरस्कार, औरंगाबाद विभाग (लातूरसह) हरी रामकृष्ण तुगांवकर, बातमीदार, दै. सकाळ, लातूर, (41 हजार रुपये), आचार्य अत्रे पुरस्कार, मुंबई विभाग, मुंबई लोकसत्ताचे विशेष प्रतिनिधी संजय कृष्णा बापट, (41 हजार रुपये), नानासाहेब परूळेकर पुरस्कार, पुणे विभाग शैलेंद्र अशोकराव पाटील, बातमीदार, दै. सकाळ, सातारा यांना (41 हजार रुपये), शि.म. परांजपे पुरस्कार, कोकण विभाग संतोष पेरणे, जिल्हा वार्ताहर, दै. पुण्यनगरी, रायगड, (41 हजार रुपये), ग. गो. जाधव पुरस्कार, कोल्हापूर विभाग, श्रीमती जान्हवी सराटे, प्रतिनिधी, दै. महाराष्ट्र टाइम्स, कोल्हापूर यांना (41 हजार रुपये), लोकनायक बापूजी अणे पुरस्कार, अमरावती विभाग, अमरावती येथील दै. दिव्य मराठीचे प्रतिनिधी सतीश ज्ञानेश्वर भटकर यांना (41 हजार रुपये), ग.त्र्यं. माडखोलकर पुरस्कार, नागपूर विभाग, नागपूर येथील दै. लोकमतचे उपसंपादक चंद्रशेखर गिरडकर यांना (41 हजार रुपये)