राज्यमंत्री आत्राम शनिवारी गोंदिया जिल्ह्यात

0
11

३१ जानेवारी व २ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यात
गोंदिया,दि.२८ : आदिवासी विकास राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम हे ३१ जानेवारी आणि २ फेब्रुवारी रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे. दिनांक ३१ रोजी सकाळी ९ वाजता नागपूर येथून शासकीय वाहनाने गोंदिया कडे प्रयाण करतील. सकाळी ११ वाजता सामाजिक न्यायमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला तसेच क्रीडा कार्यक्रमाला उपस्थित राहतील. दुपारी १२.३० वाजता गोंदिया येथून नागपूर कडे प्रयाण करतील.
दिनांक २ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता नागपूर येथून कचारगडकडे प्रयाण करतील. दुपारी १२.०५ वाजता कचारगड येथे आमदार संजय पुराम यांनी आयोजित केलेल्या आदिवासी संमेलनास उपस्थित राहतील. दुपारी ३ वाजता कचारगड येथून शासकीय वाहनाने नागपूरकडे प्रयाण करतील.