वारकरी विठ्ठल पुरस्काराने अनेकांचा होणार सत्कार

0
79

७ वे अ.भा. मराठी संत साहित्य  संमेलन
गोंदिया,दि.०५ः- वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र व डॉ. बाबासाहेब समता प्रतिष्ठान नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ७ वे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन अर्जुनी/मोरगाव येथे १५ फेब्रुवारापासून आयोजित करण्यात आले आहे. १७ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता महाराष्ट राज्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाNयांना वारकरी विठ्ठल पुरस्कार देवून गौरविण्यात येणार आहे.
वारकरी विठ्ठल पुरस्काराने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना मरणोत्तर पुरस्कार देण्यात येणार हा पुरस्कार राष्ट्रसंत तुकडोजी महारा़ज संस्थान व अ.भा.गुरूदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस जनार्दन बोथे हे स्विकारणार आहेत. वारकरी संप्रदायाच्या विशेष सेवेसाठी जीवनगौरव पुरस्काराने संत गाडगेमहाराज मिशन नागरवाडीला जाहीर झाला असून सदर पुरस्कार बापूसाहेब देशमुख स्वीकारतील.,महाराष्ट्र राज्यात व राज्याहाबेर वारकरी संप्रदायाचा प्रसार व प्रचाराचे विशेष कार्य केल्याबद्दल ह.भ.प. बाबा महाराज राशनकर पंढरपूर यांना देण्यात येणार आहे.वारकरी संप्रदायाचा प्रसार व प्रचाराचे विशेष कार्य केल्याबद्दल ह.भ.प.माधव मराहाज शिवणीकर यांना गाडी प्रदान कार्यक्रम होईल. सदर पुरस्कार पालकमंत्री राजकुमार बडोले, विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, राज्यमंत्री दिलीप कांबळे,ना.विजयबापू शिवतारे, राज्यमंत्री अमरिशराजे आत्राम,माजी मंत्री अनिल देशमुख, डॉ.शशिकांत खेडेकर,मुख्य सचिव सुमित मल्लिक, आ.कृष्णा गजबे, दिनेश वाघमारे, समाजकल्याण आयुक्त मिलिंद शंभरकर, विभागीय आयुक्त अनुपकुमार, बार्टीचे महासंचालक कैलाश कणसे, जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ.दिलीप पाटील भुजबळ, समन्वयक समता प्रतिष्ठान,जि.प.चे सीईओ राजा दयानिधी यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे.