विधान भवनावर वेगळ्या विदर्भासाठी झेंडा लावणार

0
9
गोंदिया,दि.05 : वेगळ्या विदर्भ राज्याचे आश्वासन देणार्‍या सत्तारुढ राज्य व केंद्र शासनाला वेगळा विदर्भ राज्य देण्याचे विसर पडले आहे. आता लढाई आरपारची असून १ मे रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून नागपूर विधान भवनावर वेगळया विदर्भासाठी विदर्भाचा झेंडा लावणार असल्याची माहिती विदर्भ राज्य आंदोलन समितीचे मुख्य संयोजक यांनी दिली. गोंदिया येथे स्थानिक विश्रामगृह येथे समितीच्या पदाधिकार्‍यांशी चर्चा करताना त्यांनी माहिती दिली.
केंद्र व राज्य शासनाच्या बेरोजगार विरोधी धोरणाच्या विरोधात विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या युवा आघाडी तर्पेâ एलगार पुकारण्यात आले असून येत्या १ मार्चला होळीच्या दिवशी संपूर्ण विदर्भात जिल्हा व तालुका स्तरावर बेरोजगार युवक प्रतिकात्मक डिग्री जलाओ आंदोलन करणार आहेत. तर १६ व १७ एप्रिल रोजी वेगळया विदर्भासाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीचे दुसरे राष्ट्रीय अधिवेशन नागपूर येथे घेण्यात येणार आहे. एकंदरीत २०१९ च्या निवडणूकीपूर्वी वेगळया विदर्भाची निर्मिती करावी, ही मुख्य मागणी असून यासाठीच १ मे ला नागपूर विधान भवनावर विदर्भासाठी विदर्भाचा झेंडा लावणार असल्याची माहिती या सभेत देण्यात आली. या सभेत मुख्य संयोजक राम नेवले, विदर्भ महिला प्रमुख रंचना भामळे, अ‍ॅड. अर्चना नंदगडे, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.टी.बी.कटरे, मोहसीन खान, क्रांतीकुमार साबळे, आर.डी.कटरे, आय.एच.पटले, निलेश देशभ्रतार, जमीलभाई, अ‍ॅड.भूषण मस्करे, माधूरी रहांगडाले यासह समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.