संविधानाने सत्तेसोबत कर्तव्याची जाणीव करून दिली-प्रदीप गायकवाड

0
27

तिंगाव येथे ग्रंथदिंडीने सहावे राज्यस्तरीय ओबीसी सम्मेलंनाचे थाटात उद्घाटन

गोंदिया,दि.१८(खेमेंद्र कटरे),-ओबीसी सेवा संघाच्यावतीने सवैंधानिक भारत राष्ट्र निर्माण अभियानांतर्गत सहावे राज्यस्तरीय ओबीसी साहित्य सम्मेलनाची सुरवात ग्रंथदिंडीने करण्यात आली.ग्रंथदिंडी संपूर्ण गाव भ्रमण केल्यानंतर कार्यक्रमस्थळी दाखल झाली.संविधानाच्या जयघोषासोबतच जय ओबीसीच्या घोषणेने परिसर दुमदुमलेला होता. संमेलनाचे उद्घाटन सविंधान व महापुरुषांचे ग्रंथाचे पूजन तसेच महापुरुषांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटन समता प्रकाशनाचे संपादक प्रदीप गायकवाड यांच्या हस्ते ओबीसी सेवा संघाचे संस्थापक इंजि.प्रदीप ढोबळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले.यावेळी कवयित्री अंजनाबाई खुने,मार्गदर्शक म्हणून साहित्यिक,नाटककार,कवी प्रा.ज्ञानेश वाकुडकर,ओबीसी संघर्ष कृती समितीचे जिल्हाध्यक्ष बबलू कटरे,राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सहसचिव खेमेंद्र कटरे, पं.स.सदस्य अशोक पटले,ओबीसी महिला संघाच्या जिल्हाध्यक्ष पुष्पा खोटेले,भंडारा सेवा संघाचे अध्यक्ष भैय्याजी लांबट, कन्हैया बोपचे,स्वागताध्यक्ष व तिगावंचे सरपंच नरेंद्र शिवणकर,ओबीसी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रा.बी.एम.करमरकर,ओबीसी सेवा संघाचे प्रदेश उपाध्यक्ष सावन कटरे,माजी कृषी अधिकारी मनोहर चंद्रिकापुरे,उदय टेकाडे, हरीश कोहळे,कैलास भेलावे,दिनेश हुकरे,लीलाधर गिरेपुंजे,रवींद्र शहारे आदी मान्यवर उपस्थित होते.पहिल्या सत्राची भूमिका दिनेश तिराले यांनी मांडली.
साहित्य संमनेलनाचे उद्घाटक प्रदीप गायकवाड आपल्या उदघाटकीय भाषणात म्हणाले की,सविंधान काय आहे हे समजून घेतले पाहिजे. राजाभोज जेव्हा आपल्या राज्यात फेरफटका मारत असताना त्यांना गुरे चारणारी काही मुले खेळताना दिसली. त्याचवेळी एका उंचवट्यावरून जनावरे चारणारा एक मुलगा दिशानिर्देश करताना तो सगळ्यांना आदेश करीत वेगळ्यापध्दतीने वागत असल्याचे दिसून आले.तर काही वेळानंतर तोच मुलगा जेव्हा उंचवट्यावरुन खाली उतरतो तेव्हा मात्र इतर गुराख्यासारखाच सामान्य असायचा.तेव्हा राजा भोज यांनी आपल्यासोबत असलेल्या लोकांना हा मुलगा असा का वागतो याबद्दल विचारून त्या उंचवठ्याचे खोदकाम करण्यास सांगितले.जेव्हा खोदकाम केले तेव्हा त्या उंचवट्यावरून विक्रमादित्यांचे सिंहासन आढळल्याची आख्यायिका आपण एैकली आहे.त्यावरून त्या मुलाला तो सिंहासनावर बसला असून आपण राजे आहोत याचा भास होऊन तो निर्देश देत होता मात्र त्याच सिहासंनावरुन खाली उतरल्यावर मात्र तो साधारण व्हायचा म्हणजे जोपर्यंत आपण पदाच्या खुर्चीवर असतो तोपर्यंत आपल्याला सत्तेचा माज असतो मात्र खुर्ची गेली की सत्तेचा माज उतरतो.आपल्या संविधानानेही अधिकार दिले आहेत,सत्ता दिली आहे,सोबतच कर्तव्यही सांगितले.मात्र सध्याचे सत्ताधारी सत्ता मिळाल्यानंतर मात्र सqवधानाने सांगितलेल्या कर्तव्याला विसरल्याची टीका त्यांनी केली.ओबीसी समाजाला संविधान समजण्यासाठी साहित्याच्या वाचण्यासोबतच संविधानाचे वाचनही महत्त्वाचे असल्याचे गायकवाड म्हणाले.

पुढे बोलतांना गायकवाड म्हणाले की, ओबीसी साहित्य संमेलनातून ओबीसी साहित्यिकांची ओळख जनतेला व्हायला हवी आजही आमच्या ओबीसी बहुजन साहित्यिंकाना दुय्यम लेखले जात असल्याचे सांगत महाराष्ट्रातील पहिले कादंबरीकार कुणी असतील तर ते बहुजन समाजातील बाबा पदमनजी आहेत.परंतु इतिहासात आपणाला बाबा पदमनजी यांचे नावच सांगितले गेले नाही.कारण आपल्या समाजाला आधी शिक्षणाचा अधिकार नव्हता,शिक्षण नव्हते त्यामुळे आपण लिखाणही करू शकत नव्हते अशा परिस्थितीत महात्मा फुलेंनी आमच्यासाठी खुला केलेला मार्ग प्रत्येक ओबीसी व बहुजनांनी स्वीकारून त्यास जिवंत ठेवण्यासाठी अशा संमेलनाची गरज आहे.
महात्मा फुल्यांचे साहित्य हे आधुनिक काळात ओबीसी समाजासाठी खरे मार्गदर्शक ठरणारे आहे.ओबीसी बहुजन संतांची मोठी परंपरा असून ओबीसी साहित्याच्या क्षेत्रात संत नामदेवांचा उल्लेख केल्याशिवाय संत साहित्य पूर्ण होऊ शकत नाही.संत चोखामेळा ते तुकारामापर्यंतची संत परंपरा ही कुळ,जाती व धर्माच्या बेड्या तोडणारी होती.त्याचप्रमाणे भारतीय संविधान हे सर्वधर्मसमभाव जपणारे असल्यानेच सर्वांना समानसंधी प्राप्त होत असल्याचे ते म्हणाले.
यावेळी विदर्भाच्या बहिणाबाई अंजनाबाई खुने यांचा सत्कार पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी त्यांनी मनोगत व्यक्त करताना मला पुरस्काराची काहीही गरज नाही मात्र समाजात शांतता व सर्वधर्मभावना रुजविण्याची गरज असून शासनाने याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे त्या म्हणाल्या.नेत्यांनी सत्तेत आल्यावर जनतेला विसरता कामा नये,जनतेचा पैसा खाऊ नये,न्याय देताना अन्याय करू नये अन्यथा तुमचा घात झाल्याशिवाय राहणार नाही,शेतकèयाला सन्मान द्या शेतकरी देशाची शान आहे अशा अंजनाबाई म्हणाल्या.