दगडांनो तुम्ही नसता तर आमची संस्कृतीच चालली नसती-ज्ञानेश वाकुडकर

0
46

गोंदिया,दि.१८(खेमेंद्र कटरे),ः- दगडांनो तुम्ही नसता तर आमची संस्कृतीच चालली नसती.कारण आम्हाला ज्यांच्यामुळे आज आम्ही जीवन जगण्याचा स्थितीत आलो आणि दिशा मार्गदर्शन व सत्य विचारांचा रस्ता दाखविला.ते आमचे महापुरुष महात्मा फुले,सावित्रीबाई फुले,फातिमा शेख,डॉ.बाबासाहेब आंबेडकर,राजर्षी शाहू महाराज,संभाजी महाराज हे चालत नाही,परंतु आम्हाला दगड चालतो.यावरून आमच्या मानसिकतेची ओळख होते.दगड नसते तर पूजा कुणाची केली असती,अन दगड तुम्ही नसते तर विरोधकांची सभा उधळली नसती अशा शब्दात प्रसिध्द कवी व साहित्यिक ज्ञानेश वाकुडकर यांनी सध्याच्या सांस्कृतिक अतिक्रमणांवर टीका केली.ते आमगाव तालुक्यातील तिगाव येथे सहाव्या राज्यस्तरीय ओबीसी साहित्य संमेलनात प्रमुख मार्गदर्शक म्हणून आज रविवारला(दि.दि.१८)बोलत होते.संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ओबीसी सेवा संघाचे संस्थापक इंजि.प्रदीप ढोबळे हे होेते.

कार्यक्रमाचे उद्घाटन समता प्रकाशनाचे संपादक प्रदीप गायकवाड यांच्या हस्ते पार पडले.यावेळी कवयित्री अंजनाबाई खुने,मार्गदर्शक म्हणून साहित्यिक,नाटककार,कवी प्रा.ज्ञानेश वाकुडकर,ओबीसी संघर्ष कृती समितीचे जिल्हाध्यक्ष बबलू कटरे,राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सहसचिव खेमेंद्र कटरे, पं.स.सदस्य अशोक पटले,ओबीसी महिला संघाच्या जिल्हाध्यक्ष पुष्पा खोटेले,भंडारा सेवा संघाचे अध्यक्ष भैय्याजी लांबट, कन्हैया बोपचे,स्वागताध्यक्ष व तिगावंचे सरपंच नरेंद्र शिवणकर,ओबीसी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रा.बी.एम.करमरकर,ओबीसी सेवा संघाचे प्रदेश उपाध्यक्ष सावन कटरे,माजी कृषी अधिकारी मनोहर चंद्रिकापुरे,उदय टेकाडे, हरीश कोहळे,कैलास भेलावे,दिनेश हुकरे,लीलाधर गिरेपुंजे,रवींद्र शहारे आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलतांना वाकुडकर म्हणाले की,जे पुतळे,मंदिर व मश्जिदीच्या प्रश्नावर आम्हाला गुंतवून ठेवून आपला व्यवसाय चालवितात ते आपले होऊच शकत नाही हे ओबीसी मधील युवक कधी समजणार अशा प्रश्न उपस्थित करीत गावखेड्यातील ओबीसींची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी उद्योग,शिक्षण गावागावात येण्याची गरज आहे.आजकल वाघाच्या हल्याने शेतकरी मेला तरी पर्यावरणप्रेमींनी चालतो,मात्र एखादा वाघ किंवा जनावर मेला तर चालत नाही.यावरून यांना जनावरांचे महत्त्व मोठे वाटते मात्र शेतकèयाचे मूल्य कळून येत नाही.त्यामुळे बहुसंख्य असलेल्या ओबीसी समाजातील शेतकरी,शेतमजूर कष्टकरी जनतेच्या प्रश्नासाठी व हक्कासाठी लढताना आपल्याला साहित्यासोबतच उद्योग,नोकरी व शिक्षणावरही लक्ष देण्याची वेळ आलेली आहे.ओबीसींना आपल्या न्याय हक्कासाठी मतदानातून आपली शक्ती दाखवावे लागणार आहे.ओबीसी आरक्षणाचा प्रश्न महत्त्वाचा आहे.आजच्या घडीला ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण इतरांना देऊ म्हणणारे सरकार मात्र आमच्या हक्काच्या ५२ टक्के आरक्षणाला २७ टक्केवर आणून ठेवते आणि गडचिरोली,धुळे,नंदुरबारसारख्या जिल्ह्यात ते ६ ते ९ टक्यावर आणते मग कसे काय म्हणते की तुमच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही.आमच्या आरक्षणाची टक्केवारी कमी करून तुम्ही आम्हाला दिलेला धक्का आता मतपेटीतून दाखविण्यासाठी गावोगावी अशा साहित्य व जनजागृती समेलंनाची गरज असल्याचे वाकुडकर म्हणाले.राज्यात ओबीसी आरक्षणाची मांडणीच मुळात चुकीच्या पद्धतीने केली जात असून ५२ टक्के असलेल्या या समाजाचा व्यक्ती आजही राज्याचा मुख्यमंत्री का होऊ शकला नाही.आमच्या शेतकरी, साहित्यिकांना,लेखकांना,कवी,पत्रकार,शिक्षकांना का न्याय मिळत नाही याचा विचार केला तर आपला माणूस मुख्य पदावर नसल्याचेच जाणवते.त्यामुळेच आपल्याला वैद्यकीय प्रवेशात २ टक्के आरक्षण देऊन आपली फसवणूक केली जात असतानाही आपण गप्प का अशा सवालच त्यांनी उपस्थित केला.

ओबीसी बहुजन साहित्यिकांचा संदेश पोचविण्यासाठीच संमेलन-इंजि.प्रदीप ढोबळे
संमेलनाचे अध्यक्ष इंजि.प्रदीप ढोबळे यांनी ओबीसी साहित्य संमेलन घेण्यामागची भूमिका विशद करीत ओबीसी समाजातील लेखक,साहित्यिक,कवी यांना जनतेसमोर आणण्यासाठी हे संमेलन घेण्यात येत असल्याचे सांगीतले. आमच्यातील सर्वांत मोठा घटक असलेल्या शेतकरी आज आत्महत्येच्या गर्तेत चालला आहे.त्याला थांबविण्यासाठी आपल्या थोर महापुरुषांनी साहित्यातून दिलेला संदेश पोचविण्यासाठी हे संमेलन आहे.महात्मा फुले यांनी जे लेखन केले त्यानंतरच्या बहुजन लेखकांनी लिहिण्याचा प्रयत्न केला,त्यामुळेच आज ओबीसी समाजात लेखक व साहित्यिक निर्माण होऊ लागले आहेत.सामाजिक व शैक्षणिक अधिकार नसलेल्या काळात फुल्यांनी साहित्य लेखनाची सुरवात केली त्याला ब्राम्हणवाद्यांनी विरोध केला मात्र त्यांनी मागे वळून बघितले नाही त्यामुळेच त्यांचे साहित्य आज आम्हाला बघायला मिळत आहेत.त्यावेळच्या ११८ साहित्यिकापैकी फक्त १४ साहित्यिक हे बहुजन ओबीसीतील होते यावरून आपली साहित्यातील स्थिती काय होती याचे अवलोकन करता येते असेही म्हणाले.आपले संत हे संशोधक साहित्य होते त्यांना डावलण्याचे काम नेहमीच झाल्याचे ढोबळे म्हणाले.

यावेळी स्वागताध्यक्ष नरेंद्र शिवणकर यांनीही विचार व्यक्त केले.ओबीसी सेवा संघाचे प्रदेश उपाध्यक्ष सावन कटरे लिखित गीत आमगाव जिल्हा परिषद हायस्कुलच्या शालेय विद्यार्थिनींनी सादर केले.संचालन प्रज्ञा ब्राम्हणकर व देवचंद बिसेन यांनी केले.या साहित्य संमेलनाला विदर्भासह जिल्ह्यातील ओबीसी महिला पुरुष समाजबांधवानी मोठ्यासंख्येने सहभाग नोंदविला.समेलनादरम्यान कविसमेलन व इंजि.भाऊ थुटे यांचे प्रबोधनपर किर्तन घेण्यात आले.या कार्यक्रमादरम्यान सेवानिवृत्त ओबीसी अधिकारी कर्मचारी यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला.