ओबीसी सेवा संघाचे ९ वे राज्य अधिवेशन अकोला येथे

0
10

गोंदिया,दि.२४: ओबीसी सेवा संघाचे ९ वे राज्य अधिवेशन प्रमिलाताई ओक सभागृह महात्मा गांधी रोड अकोला येथे रविवार ९ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे.या अधिवेशनात तीन सत्र होणार असून विविध विषयावर चर्चा करण्यात येणार आहे.
अधिवेशनाचे पहिले सत्रŸ सकाळी ९.३० ते १२ वाजेपर्यंत होणार असून या सत्राचे अध्यक्ष ओबीसी सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष इंजि. प्रदीप ढोबळे राहणार आहेत.उद्घाटन बामसेफचे माजी राष्ट्रीय उपाध्यक्ष डॅ. मनीषा बांगर यांच्या हस्ते होणार आहे.कर्मवीर पुरस्काराने प्रा.मा.म.देशमुख यांचा सत्कार करण्यात येणार आहे.प्रमुख वक्ते म्हणून भारतीय मुस्लीम परिषदेचे अध्यक्ष प्रा. जावेद पाशा उपस्थित राहणार आहेत.प्रास्ताविक ओबीेसी सेवा संघाचे केंद्रीय सदस्य प्रा.डी.ए. दळवी करणार आहेत.दुसरे सत्र दुपारी १ ते ३.३० सत्र दरम्यान होणार असून अध्यक्षस्थानी ओबीसी सेवा संघाचे महासचिव इंजि. नरेंद्र गद्रे राहणार आहेत.ईतर मागासर्वीय इन्कलाबच्या बिजेला भोनकर, वंदना महाजन, विठ्ठल सातव, भारतीय पिछडा शोषित संघटनेचे अध्यक्ष सत्यजीत मायनवार, ओबीसी जनगणना परिषदेचे प्रा. श्रावण देवरे मार्गदर्शन करणार आहेत.तिसरे समारोपीय सत्र दुपारी ३.३० ते ६.३० वाजता होणार असून या सत्राचे अध्यक्ष ओबीसी सेवा संघाचे उपाध्यक्ष ज्ञानदेव खराडे राहणार आहेत.यावेळी महिला प्रतिनिधी मीना भोसले,इंजि.नितीन बुटी,बळवंत सुतार,बापू राऊत,सावन कटरे,सडू खामकर,भय्याजी लांबट,मोहर देशमाने,श्रीनिवास मस्के,वामन अंकुश,प्रभाकर चोदंडे उपस्थित राहणार आहेत.