वरुड येथे १ डिसेंबरला ओबीसी युवक प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

0
8

अमरावतीःदि.२४:- इतर मागासवर्गीयांची ओळख (ओबीसी) आरक्षण चळवळीचा इतिहास,आजचे वास्तव आणि पुढील दिशा या विषयाला घेऊन जिल्ह्यातील वरुड येथे दोन दिवसीय ओबीसी युवक प्रशिक्षण शिबिराचे आयोजन १ व २ डिसेंबरला करण्यात आले आहे.बहुजन संघर्ष समिती,ओबीसी महिला संघटन,ओबीसी युवक संघटन व फुंकार महिला संघटनेच्यावतीने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात सकाळी १० वाजता या शिबिराचे उदघाटन माजी आमदार नरेशचंद्रजी ठाकरे यांच्या हस्ते बहुजन संघर्षचे सपांदक व जेष्ठ विचारवंत नागेश चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. मनोहर आंडे, राजेंद्र पाटील, अजयभाऊ नागमोते, डॉ. सुधाकर बंदे, डॉ. एस.जी.कडू, शशीकांत बेलसरे, पुरुषोत्तम कळमकर, बबनराव पाटील, अरqवद देशमुख, आत्माराम निस्वादे, डॉ. दिलीप धावडे, भिमराव हरले, उपस्थित राहणार आहेत.कार्यक्रमाचे प्रास्ताविक संध्या सराटकर या करणार आहेत. १ डिसेबंरला दुपारी ३ वाजता इतर मागासवर्गीयांची ओळख (ओबीसी) आरक्षण चळवळीचा इतिहास,आजचे वास्तव आणि पुढील दिशा या विषयावर चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले आहे.या चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी डॉ. सुरेंद्र बुराडे राहणार आहेत. तर प्रमुख मार्गदर्शक़ म्हणून राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या महिला अध्यक्ष प्रा. सुषमा भड,जेष्ठ विचारवंत व कवी प्रा. शाम झाडे,राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सहसचिव व बेरार टाईम्सचे संपादक खेमेंद्र कटरे उपस्थित राहणार आहेत. सायकांळी ६ ते ८ गु्रप डिस्कशन (समुह चर्चा) करण्यात आहे.त्यामध्ये अनिल वानखेडे,गोqवद वरवाडे,सुनिल जुमडे सहभागी होणार आहेत.रविवार २ डिसेंबर रोजी संविधान चर्चा या विषयावर कार्यक़्रम होणार आहे. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून अ‍ॅड, समिक्षा गणेशे, अपेक्षा दिवाण तर दुपारी १२ ते २.३० वाजे सत्यशोधक चळवळीचा इतिहास आणि जाहीरनामा, आजचे संदर्भ आणि वाटचाल, म.फुले कृत सार्वजनिक सत्यधर्माचा परिचय या विषयावर कार्यक्रम होणार आहे. अध्यक्षस्थानी प्रा. सतीश जामोदरकर तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून शुभांगी घाटोळे,शरद वानखेडे उपस्थित राहणार आहेत.समारोपीय कार्यक्रमात सायकांळी ३ वाजता देश,भाषा,संस्कृती,धर्म,वंश वास्तव आणि qसधू राष्ट्राचे निर्माण या विषयावर नागेश चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली चर्चा होणार असून चर्चेमध्ये प्रा.साहेबराव विधळे,यशवंत सराटकर,अनिल वानखेडे सहभागी होणार आहेत.