नक्षल सप्ताहात कर्मचाèयांना सतर्क राहण्याचे आवाहन

0
6
file photo

गोंदिया,दि.२४ : जिल्ह्यात नक्षल चळवळ सक्रीय आहे, याचा प्रत्यय मागील महिन्यात कारवाईदरम्यान जिल्हा पोलिसांनी आणून दिले.घटनाक्रमामध्ये पोलिसांनी नक्षल्यांचा घातपात करण्याचा कटही उधळून लावला. दरवर्षी माओवादी संघटनेतर्फे २ ते ८ डिसेंबरदरम्यान नक्षल सप्ताह साजरा केला जातो. त्यामुळे सर्व कर्मचाèयांनी नक्षल
सप्ताह लक्षात घेवून सतर्क रहावे, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षकांमार्पफ्त मिळालेल्या सूचनानुसार जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यपालन अधिकारी सुधीर वाळके  यांच्यामार्फत जिल्ह्यातील कर्मचाèयांना करण्यात आले आहे.जिल्ह्यात प्रत्येक वर्षी २ ते ८ डिसेंबरदरम्यान माओवादी संघटनेच्यावतीने नक्षल सप्ताह साजरा करण्यात येतो. या सप्ताहअंतर्गत मोठ्या प्रमाणात घातपात रेल्वे स्टेशन तसेच रेल्वे टड्ढॅकचे नुकसान तसेच जाळपोळ व गंभीर स्वरुपाच्या घडून आणतात. त्या अनुषंगाने नक्षल प्रभावित क्षेत्रातील कर्मचाèयांनी सतर्क राहून कार्य करावे, असे आवाहन जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकाèयांना जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या सूचनेनुसार जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले आहे. विशेष म्हणजे, सर्व कार्यालयातील कार्यरत कर्मचाèयांनी आपले रेकॉर्ड सुरक्षेकरिता नजिकच्या पोलिस ठाण्याच्या संपर्कात ठेवावे तसेच नक्षलग्रस्त भागात सप्ताहकाळात एकटे-दुकटे न जाता पोलिसांच्या संपर्कानुसारच आवागमन करावे असेही सूचित करण्यात आले आहे.विशेष म्हणजे, या कार्यवाहीला प्राधान्य देऊन कार्यवाहीस विलंब झाल्यास तसेच इतर कोणत्याही प्रकारची घटना घडल्यास विभाग प्रमुखांना दोषी ठरविण्यात येईल असेही सांगण्यात आले आहे.