मराठा आरक्षणाला ओबीसी समाजाचा विरोध, आझाद मैदानावर केले आंदोलन

0
11
दरम्यान या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जंयत पाटील यांनी ओबीसींनाही लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळाले पाहिजे असे सांगत आमची सरकार केंद्रात सत्तेत असतानाच जातीनिहाय जनगणना केली आहे परंतु ते आकडे जाहिर झालेले नाहीत असे सांगत आपण ओबीसींच्या सोबत असल्याचे म्हणाले.तर चंद्रकांत बावकर यांनी सरकारने दिलेले आरक्षण चुकीचे असून कुणबी समाजाची लोकसंख्या सुध्दा मराठामध्ये समाविष्ठ केल्याचे सांगत सरकारने ईसीबीसीमध्ये स्वतंत्र आरक्षण देण्यात येत असल्याचे म्हटले आहे.ते न्यायालयात टिकणार नसल्याने अखेर ओबीसीतच मराठा समाजाचा समावेश करण्यात येईल अशी शंका व्यक्त केली.
बहुप्रतिक्षित मराठा आरक्षण विधेयक आज (गुरूवारी) विधानसभा आणि विधानपरिषदेतही एकमताने मंजूर करण्यात आले. मुळ ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला स्वतंत्र ओबीसी गटातून १६ टक्के आरक्षण देण्यात आले आहे. मात्र, या आरक्षणाला ओबीसी संघर्ष समितीने विरोध केला आहे. मराठा समाजाला ओबीसी वर्गातून आरक्षण देऊन सरकार घुसखोरी करत असल्याचा आरोप समितीने केला आहे.  यासाठी समितीच्यावतीने आझाद मैदानावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी समितीच्यावतीने काही मागण्या करण्यात आल्या. त्या पुढीलप्रमाणे,
१. मराठा जातीची लोकसंख्या ३२ टक्के सांगितली जाते, ती दिशाभूल करणारी आहे. ही लोकसंख्या मराठा व कुणबी जातीची एकत्रित लोकसंख्या आहे. कुणबी ही जात ओबीसी प्रवर्गात समाविष्ट आहे. त्यामुळे मराठा जातीच्या लोकसंख्येला कोणताही शास्त्रीय आधार नाही.
२.  मराठा ही प्रतिष्ठा प्राप्त राज्यकर्ते आणि लढवय्या जात आहे. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षणात वाटा देऊन  सरकार आमच्यावर अन्याय करत आहे. त्यामुळे आम्ही या आरक्षणाचा विरोध करत असल्याचेही समितीच्यावतीने स्पष्ट करण्यात आले.