मुंबई –ज्येष्ठ समाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी केंद्र सरकारच्या वादग्रस्त भूसंपादन विधेयकाविरोधात आयोजित केलेली पदयात्रा रद्द करण्यात आली आहे. गारपीट आणि अवकाळी पावसामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहेत. परिणामी या पदयात्रेला शेतकऱ्यांचा अपेक्षित प्रतिसाद मिळण्याची शक्यता नव्हती. त्यामुळे येत्या ३० मार्चपासून सुरू होणारी वर्धा ते दिल्ली ही भूसंपादन विधेयकाविरोधातील पदयात्रा रद्द करण्यात आली आहे.