टोलनाक्यांवर आमदारांना आयकार्ड सक्ती का?

0
15

मुंबई : टोलनाक्यावर आयकार्ड दाखवण्यावरुन सर्वपक्षीय आमदारांनी नाराजी दर्शवली आहे. टोलच्या मुद्द्यावरून विधानपरिषदेवर आज चर्चा सुरु होती. त्यावेळी सर्वपक्षीय आमदारांनी सभापतींकडे नाराजी व्यक्त केली. टोलनाक्यांवर आमदारांनाही आयकार्ड का दाखवावा लागतो, असा सवाल सर्वपक्षीय आमदारांनी विचारला.दरम्यान आमदार बच्चू कडू यांनी आमदारांना टोलमाफी देण्याला विरोध केला आहे.जनता पैसे भरु शकते तर आम्ही आमदार का नाही,असे सांगत एकीकडे आमदार स्वतला जनतेचे सेवक म्हणवून घेतात आणि दुसरीकडे टोलमाफीची मागणी करतात हे सयुंक्तीकनसल्याचे म्हणाले.

भाजप सरकार सत्तेवर येण्याआधी टोलमुक्तीची घोषणा केली होती. मात्र त्याबद्दल सरकार चकारशब्दही काढायला तयार नाही. एवढंच नाही तर अर्थसंकल्पात मुनगंटीवार यांनी टोल हा शब्दही उच्चारला नाही. मात्र जेव्हा आमदारांवर वेळ आली तेव्हा सगळ्या पक्षातल्या आमदारांनी एकत्र येऊन गळा काढला.

टोलनाक्यावर टोल देण्यासाठी आम्हाला थांबावं लागतं, टोलनाक्यावर आम्हाला का ओळखत नाहीत, आमचे आयकार्ड का मागितले जातात, आम्हाला व्हीआयपी ट्रिटमेंट का दिली जात नाही असे एक ना अनेक प्रश्न सभापती आणि सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांना विचारत सर्वपक्षीय आमदारांनी गळा काढला. एवढंच नाही तर सर्व टोलनाक्यावर आमचे आयकार्ड पाठवून द्या म्हणजे ते आम्हाला ओळखतील अशी मागणी करायलाही या आमदरांनी मागे पुढे पाहिले नाही.