माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे उपक्रम अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवावेत- राज्यपाल

0
20

मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत राबविण्यात येत असलेले विविध उपक्रम अत्यंत उपयुक्त आहेत. ते अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवावेत, असे सांगून राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी या उपक्रमांना शुभेच्छा दिल्या.

माहिती महासंचालक चंद्रशेखर ओक तसेच संचालक (प्रशासन) देवेंद्र भुजबळ यांनी शनिवारी राजभवन येथे राज्यपालांची सदिच्छा भेट घेतली. श्री.ओक यांनी राज्यपालांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या तसेच जय महाराष्ट्र आणि दिलखुलास या उपक्रमांद्वारे विविध क्षेत्रांतील मान्यवर तज्ज्ञांच्या घेतल्या जाणाऱ्या मुलाखतींविषयी सविस्तर माहिती दिली. या उपक्रमांचे राज्यपालांनी कौतुक केले. याशिवाय लोकराज्य, महान्यूज वेबपोर्टल याविषयी देखील राज्यपालांनी उत्सुकतेने माहिती घेतली.