एर्नाकुलम्‌ दुरांतो एक्‍सप्रेसचे 10 डबे घसरले

0
4

वृत्तसंस्था
रत्नागिरी – कोकण रेल्वे मार्गावरील एलटीटी-एर्नाकुलम दुरांतो एक्‍सप्रेसचे 10 डबे रूळावरून खाली घसरले आहेत. आज (रविवार) सकाळी साडे सहाच्या सुमारास घडलेल्या या अपघातात अद्याप कोणत्याही जीवित हानीचे वृत्त नाही. दरम्यान रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. आज (रविवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास एलटीटी-एर्नाकुलम दुरांतो एक्‍सप्रेसचे 10 डबे रूळावरून घसरले. दरम्यान या अपघातात कोणत्याही प्रकारच्या जीवित हानीचे वृत्त नाही. मात्र कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. रेल्वे कर्मचारी घटनास्थळी पोचले असून वाहतूक पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. दरम्यान या अपघातामुळे काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत