उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाला कॅबिनेटची मान्यता

0
10

मुंबई : राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापूर खंडपीठ स्थापन करण्याबाबतच्या प्रस्तावाला मान्यता दिली असून यामुळे सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्गच्या नागरिकांना याचा फायदा मिळू शकेल.आता कोल्हापुर हे महाराष्ट्राच्या उच्च न्यायालयाचे चौथे खंडपीठ म्हणून अस्तित्वात आले आहे. आत्तापर्यंत मुंबई उच्च न्यायालयाची नागपूर, औरंगाबाद आणि गोवा अशी तीन खंडपीठ आहेत.कोल्हापुरसह रत्नागिरी, सिंधुदूर्ग, सोलापूर, सांगली, सातारा, या सहा जिल्ह्यांसाठी कोल्हापुर हे खंडपीठ असेल. मागील अनेक वर्षापासुन कोल्हापुरला खंडपीठ असावे अशी मागणी सातत्याने होत होती.