धानाला प्रती क्विंटल २५० रूपये प्रोत्साहन अनुदान जाहीर

0
11

गोंदिया ,दि.12: धान उत्पादक शेतकèयांना प्रती qक्वटल प्रोत्साहन अनुदान देण्यात यावा, या जिल्हा भाजपाच्या मागणीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवी झेंडी दिली असून धानाला प्रती qक्वटल २५० रूपये प्रोत्साहन अनुदान जाहीर केले आहे. याबद्दल जिल्हा भाजपतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री राजकुमार बडोले, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आभार व्यक्त केले आहे.विशेष म्हणजे काँग्रेसने गोंदीया भंडारा येथे तर राष्ट्रवादीने धान उत्पादकांच्या समस्याेला घेऊन आंदोलनाचा इशारा दिला होता.विरोधी पक्षाच्या आंदोलनाचा धसका आणि येत्या जिल्हा परिषद निवडणुकीत पक्षाला होणार्या नुकसानीची भीती बघूनच भाजपने धानाला बोनस जाहिर केल्याचे राजकीय वतुर्ळात बोलले जात आहे.
धान उत्पादक शेतकरी मागील अनेक वर्षापासून सततच्या अतिवृष्टी व दुष्काळामुळे त्रस्त झाला होता. जिल्हा भाजपतर्फे शेतकरी हिताच्या मागण्यांसाठी नेहमीच आंदोलने आदीच्या माध्यमातून शासनाकडे पाठपुरावा करण्यात आला. भाजप सत्तेवर येताच जिल्हा भाजपच्या वतीने पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या नेतृत्वात जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल व आ. विजय रहांगडाले, आ. संजय पुराम यांनी धान उत्पादक शेतकèयांना प्रोत्साहन अनुदान देण्याच्या मागणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नियमीत निवेदन व चर्चेच्या माध्यमातून पाठपुरावा केला. याचेच फलीत म्हणून मंगळवार, ११ मे रोजी झालेल्या केबिनेट मंत्रीमंडळाच्या बैठकीत झालेल्या चर्चेनंतर धानाला प्रती qक्वटल २५० रूपये प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला व तसे जाहीर केले.