शरद पवार 30 मेपासून दुष्काळी भागाच्या दौर्‍यावर

0
18

मुंबई, दि.२९–राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मराठवाड्यातील दुष्काळी भागाचा दौरा करणार आहेत. खरीपाच्या तोंडावर हा दौरा करून शरद पवार शेतकर्‍यांच्या व्यथा जाणून घेणार आहेत.
30, 31 मे आणि 1 जून ला पवारांचा हा दौरा असणार आहे. मराठवाड्यातल्या औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यातील दुष्काळाची पाहणी शऱद पवार करणार आहेत. पवारांबरोबर या दौर्‍यामध्ये विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेही असणार आहेत..