दिल्ली विमानतळावर किरणोत्सारी पदार्थाची गळती

0
13

वृत्तसंस्था
नवी दिल्ली दि.२९– दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज दुपारी 12 च्या सुमारास किरणोत्सारी पदार्थाची गळती झाली. यामुळे विमानतळावरील प्रवाशांना डोळे चुरचुरण्याचा त्रास झाला. हा किरणोत्सारी पदार्थ तुर्कीहून दिल्लीतील फोर्टिस रूग्णालयात आणण्यात येत होता. मात्र, दिल्ली विमानतळावर त्याची गळती झाली. प्रवाशांना त्रास होऊ लागताच सुरक्षा यंत्रणांना याची माहिती देण्यात आली.
विमानतळ सुरक्षा यंत्रणांनी ही माहिती तत्काळ एनडीआरएफ व अणु ऊर्जा विभागाला दिली. लागलीच ही दोन्ही पथके तेथे हजर झाली. दरम्यान, या गळतीची तीव्रता कमी होती, अशी माहिती अणुऊर्जा विभागाचे ओ पी सिंग यांनी सांगितले. दरम्यान, किरणोत्सारी पदार्थाची गळती रोखण्यात संपूर्ण यश आल्याचे त्यांनी सांगितले. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी गळती रोखल्याचे सांगत चिंता करण्याचे कारण नाही असे स्पष्ट केले आहे.