विधान मंडळाच्या विविध समित्यांवरील सदस्यांची नावे जाहीर

0
11

धर्मादाय खाजगी रुग्णालयांच्या तपासणीसाठी संयुक्त समिती जाहीर
मुंबई : धर्मादाय खाजगी रुग्णालयांची तपासणी करण्यासाठी विधानमंडळाकडून संयुक्त समिती जाहीर करण्यात आली आहे.विधी व न्याय राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील हे समितीचे प्रमुख असून, आमदार डॉ. विजयकुमार गावित, भीमराव धोंडे, किसन कथोरे, राम कदम, डॉ.देवराव होळी, डॉ.राहुल आहेर, डॉ.पंकज भोयर, डॉ.मिलिंद माने, डॉ.तुषार राठोड, डॉ.बालाजी किणीकर, डॉ.शशिकांत खेडेकर, हेमंत पाटील, कालिदास कोळंबकर, डी.पी.सावंत, अमिन पटेल, डॉ.सतीश पाटील, राणा जगजितसिंह पाटील, दत्तात्रय भरणे, डॉ.अपूर्व हिरे, प्रकाश बिनसाळे, अरुणकाका जगताप, मुझफ्फर हुसेन, संजय दत्त हे या समितीचे सदस्य आहेत.

विधान परिषद नियम समितीची स्थापना
मुंबई : विधानपरिषद नियम समितीत 2015-16 या वर्षासाठी सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर हे समितीचे प्रमुख असून विरोधी पक्षनेता धनंजय मुंडे, आमदार रामनाथ मोते, नागो गाणार, ॲड. अनिल परब, सुनिल तटकरे, हेमंत टकले, मुझफ्फर हुसेन, दिलीपराव देशमुख हे सदस्य आहेत. विशेष निमंत्रित म्हणून शिवाजीराव देशमुख, माणिकराव ठाकरे, प्रकाश बिनसाळे यांची निवड करण्यात आली आहे.

महिला हक्क व कल्याण समिती स्थापन
मुंबई : विधीमंडळ स्तरावरील महिला हक्क व कल्याण समितीसाठी सदस्यांची नियुक्ती करण्यात आली असून श्रीमती मनिषा चौधरी या समितीच्या प्रमुख असतील. आमदार मंदा म्हात्रे, मोनिका राजळे, सीमा हिरे, डॉ.भारती लव्हेकर, स्नेहलता कोल्हे, प्रतापराव पाटील-चिखलीकर, योगेश घोलप, प्रणिती शिंदे, संध्यादेवी कुपेकर, दिपीका चव्हाण, स्मिता वाघ, विद्या चव्हाण, सतिश चव्हाण, ॲड.हुस्नबानू खलिफे हे या समितीचे सदस्य आहेत.

सार्वजनिक उपक्रम समितीवर सदस्यांची नियुक्ती
मुंबई : विधीमंडळ स्तरावरील सार्वजनिक उपक्रम समितीसाठी सदस्यांची नियुक्ती करण्यात आली असून आमदार डॉ.सुनिल देशमुख हे या समितीचे प्रमुख आहेत.
ॲड.राज पुरोहित, भीमराव धोंडे, बाबुराव पाचर्णे, डॉ.आशिष देशमुख, आकाश फुंडकर, द्वारम मल्लीकार्जून रेड्डी, अमित साटम, राजन साळवी, हर्षवर्धन जाधव, सुनिल राऊत, मनोहर भोईर, अब्दुल सत्तार अब्दुल नबी, ॲड.यशोमती ठाकूर, भारत भालके, पंकज भुजबळ, हनुमंत डोळस, मकरंद जाधव-पाटील, हितेंद्र ठाकूर, बळीराम सिरसकर, ॲड.अनिल परब, किरण पावसकर, जयवंतराव जाधव, अनंत गाडगीळ, श्रीमती दिप्ती चवधरी हे या समितीचे सदस्य आहेत.

रोजगार हमी योजना समितीवर सदस्यांची नियुक्ती
मुंबई : विधीमंडळ स्तरावरील रोजगार हमी योजना समितीच्या अध्यक्षपदी जयकुमार रावल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.आमदार संजय भेगडे, सुरेश हळवणकर, कृष्णा खोपडे, प्रशांत बंब, सुभाष देशमुख, संगिता ठोंबरे, संतोष दानवे, संदिपानराव भुमरे, सदानंद चव्हाण, नारायण पाटील, डॉ.संजय रायमुलकर, जयकुमार गोरे, राहुल बोंद्रे, भाऊसाहेब कांबळे, बबनराव शिंदे, शिवेंद्रसिंह भोसले, डॉ.सतीश पाटील, ॲड.राहुल कुल, शरददादा सोनावणे, श्रीमती शोभाताई फडणवीस, नरेंद्र पाटील, अनिल तटकरे, हरिसिंग राठोड, आंनदराव पाटील हे या समितीचे सदस्य आहेत.

उपविधान समितीसाठी सदस्यांची नियुक्ती
मुंबई : विधीमंडळ स्तरावरील उपविधान समितीच्या अध्यक्षपदी विजयराव औटी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.आमदार ॲड. रामचंद्र अवसरे, अतुल भातखळकर, ॲड. संजय धोटे, श्रीमती देवयानी फरांदे, अमल महाडीक, सुरेश भोळे, तुकाराम काते, अशोक पाटील, अमर काळे, नितेश राणे, संग्राम जगताप, राहुल जगताप, सुभाष ऊर्फ पंडीतशेठ पाटील, विनायक मेटे, विक्रम काळे, आनंद ठाकूर, श्रीमती हुस्नबानू खलिफे, अमरनाथ राजूरकर हे या समितीचे सदस्य आहेत.

अनुसूचित जाती कल्याण समितीवर सदस्यांची नियुक्ती
मुंबई : विधीमंडळ स्तरावरील अनुसूचित जाती कल्याण समितीच्या प्रमुखपदी डॉ.सुरेश खाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.आमदार लखन मलिक, हरिष पिंपळे, डॉ. सुधाकर भालेराव, सुधीर पारवे, रमेश बुंदीले, सुभाष साबणे, डॉ.सुजित मिणचेकर, प्रा.वर्षा गायकवाड, नरहरी झिरवाळ, इम्तीयाज जलील सय्यद, विजय ऊर्फ भाई गिरकर, ॲड.जयदेव गायकवाड, प्रकाश गजभिये, प्रा.जोगेंद्र कवाडे हे या समितीचे सदस्य आहेत.